Maharashtra Politics: आज महाराष्ट्रात भाजपची मोठी बैठक, 'या' तारखेला देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

devendra fadnavis oath as cm: महाविकास आघाडीचे सरकार पडल्यावर फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात
 Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची खुर्ची गेली. कालपर्यंत उद्धव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री झाले आहेत. यामुळे आता भाजपने सरकार स्थापनेची कसरत सुरू केली आहे. सकाळी 11 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे प्रभारी सी.टी.रवी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. 1 किंवा 2 जुलैला फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे मानले जात आहे.

हॉटेल ताजमध्ये बुधवारी रात्री उशिरा आमदारांची भेट घेऊन फडणवीस (Devendra Fadnavis) बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू तर मनात आनंदाची लाट उसळली होती. मात्र, मंगळवारी फडणवीस दिल्लीत आले असता सरकार स्थापनेची संपूर्ण रणनीती आखण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र उद्धव यांनी संपूर्ण मैदान रिकामे केल्याने आता फडणवीसांचा मार्ग सुकर झाला आहे

 Devendra Fadnavis
आसाम पूरग्रस्तांना एकनाथ शिंदे यांनी दिला मदतीचा हात

चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली,
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हेच आता पुढील रणनीती ठरवतील. विजयी होताना भाजप कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची घोषणा होताच भाजपच्या गोटात जल्लोष सुरू झाला. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी देवेंद्र फणवीस यांच्या घरी जमून विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. फडणवीस लवकरच राज्याची सूत्रे हाती घेतील, असे यातील अनेक नेत्यांनी सांगितले. अखेर सत्याचा विजय होतो, असे माजी मंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले, फडणवीस नेहमी सभागृहात परतणार असल्याचे सांगत. आताच हि वेळ आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत येतील.” महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांना मिठाई खाऊ घातली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com