Sanjay Raut  Dainik Gomantak
महाराष्ट्र

यंदा दसरा मेळावा होणारच; संजय राऊत

पहिलाच दसरा मेळावा हा ऑनलाईन Online पद्धतीने घेतला होता. कोरोनाचा Covid 19 प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता आणली जात आहे

दैनिक गोमन्तक

मुंबई: शिवसेनेचा गेल्या वर्षी दसरा मेळावा (Shiv Sena Dussehra) शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर Freedom Fighter Savarkar सभागृहात येथे घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यामंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुळे सर्व शिवसैनिकांना ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वच गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षीचा दसरा मेळावा कसा असणार यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे.

संजय राऊतांना आणि राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेतली त्यावेळी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी चर्चा झाली. संजय राऊत माध्यमांशी बोलताना त्यांना दसरा मेळावा होणार का? असा प्रश्न विचारला गेला. यावर राऊत म्हणाले, शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा कोरोनाचे सर्व नियम पाळून होणारच आहे. तसेच, उद्धव ठाकरे हे ऑनलाईननेसुद्धा शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. मात्र, यावेळीचा हा दसरा मेळावा जाहीररित्या होणारच आहे. अशी मोठी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.

कोरोनामुळे Covid 19 राज्याचे मुख्यामंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर पहिलाच दसरा मेळावा हा ऑनलाईन पद्धतीने घेतला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोरोनाच्या निर्बंधात शिथिलता आणली जात आहे. त्यामुळे राऊतांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्या बाबत अंतिम निर्णय काय घेणार? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT