गोव्यात वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात शिवसेनेचा जाहीर निषेध

पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी स्वीकारावी हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य एकदम चुकीचे आहे. त्याचा निषेध आम्ही शिवसेना करीत आहे.
बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी वास्को येथील आयोजित धरणे व निषेध सभेत केले.
बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी वास्को येथील आयोजित धरणे व निषेध सभेत केले.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: राज्यात वाढती गुन्हेगारी, खून, चोर्‍या, बलात्कार (Rising crime, murder, theft, rape) यावर आळा घालण्यास राज्य सरकार सपशेल अपयशी (State government failed) ठरल्याने सरकारने पायउतार व्हावे. तसेच बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी वास्को येथील आयोजित धरणे व निषेध सभेत केले.

शिवसेना गोवा राज्य समितीतर्फे गोव्यात वाढत्या गुन्हेगारीला अनुसरून वास्कोत जाहीर धरणे व निषेध सभेचे आयोजन येथील मध्यवर्ती ठिकाणी केले होते. यावेळी शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, दक्षिण जिल्हाप्रमुख एलेक्सी फर्नांडिस, राज्य सरचिटणीस मिलिंद गावस, राज्य प्रमुख सुभाष केरकर, मुरगाव तालुका प्रमुख दिपक येरम, वास्को पदाधिकारी राजाराम पाटील,बार्देश तालुका प्रमुख विन्सेंट पेरेरा, सत्तरी तालुका प्रमुख गुरुदास गावकर, वास्को मतदारसंघ पदाधिकारी, जिल्हा सचिव अर्जुन घाडी,तिसवाडी तालुका प्रमुख महेश पेडणेकर, जिल्हा सचिव मेहबूब नालबान,हणजुणे शाखा प्रमुख निलू सावंत, सुनील नाईक, समिप परवार, रुपेश गावकर, दिनकर मळीक, शांताराम मसूरकर आदी उपस्थित होते.

बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी वास्को येथील आयोजित धरणे व निषेध सभेत केले.
गोव्यातील साओ जॅसिंटो बेटांकडे बघूनही वेदनेची कळ येणे गरजेचे; शिवसेना

पुढे बोलताना कामत म्हणाले, बाणावली येथे दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला याचा तपास करण्याऐवजी माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी स्वतः घ्यावी असे वक्तव्य केले. हे वक्तव्य म्हणजे दिशाभूल करणारे आहे. पण सत्य परिस्थिती काय आहे हे लोकांसमोर उघड करण्यासाठी आम्ही तालुकास्तरीय निषेध सभेचे आयोजन करून सरकारचे पितळ उघडे पडणार आहेत. बलात्कार करणारे राजकारणाचे सगळे सोयरे असल्याने हे प्रकरण दडपवण्याचे काम चालू असून हे एकदम चुकीचे असल्याचे ते म्हणाले. त्याचा आम्ही निषेध करतो असे ते सांगताना मुख्यमंत्र्यांनी याविषयी जाहीर माफी मागावी असे ते शेवटी म्हणाले.

पालकांनी आपल्या पाल्याची जबाबदारी स्वीकारावी हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य एकदम चुकीचे आहे. त्याचा निषेध आम्ही शिवसेना करीत आहे. सदर बलात्कार प्रकरणाचा शोध घेण्यास पोलिस प्रशासन कुचकामी ठरले आहे. त्याला पोलिस प्रशासन जबाबदार आहे. जबाबदारी झुटकारुन गुन्हेगारांना वाव देणारे विधान मुख्यमंत्र्याकडून करण्यात आले आहे. आणखी किती निष्पाप मुलींचा जीव घेणार याचा जाब मुख्यमंत्र्यानी द्यावा. तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी असल्याचे राज्य सरचिटणीस मिलिंद गवस यांनी केली.

बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी शिवसेनेचे गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी वास्को येथील आयोजित धरणे व निषेध सभेत केले.
Chandrakant Bandekar case: पोलिस स्टेशनवर शिवसेना पेडणेतर्फे धरणे आंदोलन

दक्षिण जिल्हाप्रमुख एलेक्सी फर्नांडिस म्हणाले की गोव्यातील कायदा-सुव्यवस्थेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तीन तेरा वाजवले असून कायदा सुव्यवस्था ढासळत गेल्याने गोव्यात गुन्हेगारीला वाव मिळत आहे. गोव्याच्या सत्तेचा मुख्यमंत्र्यांनी वाट लावली आहे. आज महागाई वाढत आहे. त्यावर उपाययोजना होत नाही. बलात्कार प्रकरणी भाजपच्या महिला कुठे गेल्या. त्या आवाज का उठवत नाही. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.कोरोना काळातही सरकार परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सपशेल अपयशी ठरला आहे. भाजप सरकारने गोव्याची वाताहत करून सोडली आहे असे ते शेवटी म्हणाले.

मुरगाव तालुका प्रमुख दीपक येरम यांनी गोव्याची स्थिती एकदम दयनयीन होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. तसेच वास्कोतील प्रकल्पांना खिंडार पडलं आहे. महागाईत सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाजप सरकारने जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. गुन्हेगारीचा छडा लावण्यास राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com