Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

''शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका 20 फूट खाली गाडले जाल''

शिवसेनेचा संयम पाहू नका संजय राऊत यांनी दिला इशारा

दैनिक गोमन्तक

मुंबई : महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा व शिवसैनिक यांच्यात चांगलीच जुंपली असुन यामूळे चांगलच तापलं आहे. राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं आहे. शिवाय, राणा दाम्पत्य अमरावतीवरून मुंबईत देखील आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.(sanjay raut news)

अखेर राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही मातोश्रीवर जाणार नसल्याचं सांगत, आपले आंदोलन रद्द केले. माध्यमांसमोर त्यांनी तशी घोषणा देखील दिली. यानंतर राणा दाम्पत्याला पोलीसांनी ताब्यात घेतल्याने यावरुन नविन राजकिय घडामोडींना वेग येणार कि काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये पत्रकारपरिषद घेत मातोश्रीशी छेडछाड करू नका, 20 फूट खाली गाडले जाल असे स्पष्ट करत राणा दाम्पत्य आणि भाजपावर सडकून टीका केली.

“मुंबईत हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत, जो रेटा आहे शिवसैनिकांचा. मला आमच्या शिवसैनिकांचंआश्चर्य आणि कौतुकही वाटत आहे. माझं आताच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, शिवसैनिकांनी तिथे काही रुग्णवाहिका देखील तयार ठेवल्या होत्या, जर बंटी आणि बबलीला रुग्णवाहिकेतून न्यावं लागलं तर. म्हणजे आंदोलन करणाऱ्यांची शिवसैनिक किती काळजी घेतात बघा, आमच्या शिवसैनिकांचा मानवतावादी दृष्टीकोन पाहा. पूर्णपणे हे भंपक, बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपाचे काही प्रमुख लोक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मातोश्रीवर दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणं हे कोणाचं कारस्थान आहे ? या ज्या खासदार आहेत, त्यांचा हिंदुत्वाशी काय संबंध ? या बंटी आणि बबलीचा श्रीरामाचं नाव घ्यायला यांचा विरोध होता. अयोध्या आंदोलनाला यांचा विरोध होता. हिंदुत्व शब्द घ्यायला यांना लाज वाटत होती आणि आज ही लोक हनुमान चालीसा, हिंदुत्व अशाप्रकारची भाषा वापरून महाराष्ट्रासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा हिंदुत्व आम्हाला शिकवण्याचा कोणी अतिशहाणपणा करू नये. हे जे दीड शहाणे आहेत, त्यांना आम्ही आजही सांगतो कृपा करून शिवसेनेच्या वाटयाला जाऊ नका. मातोश्रीशी छेडछाड करू नका, २० फूट खाली गाडले जाल. हे मी कॅमेऱ्यासमोर सांगतोय. शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका.” असा इशारा देखील यावेळी संजय राऊत यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT