कोणाला हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी : दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्रात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरुन वातावरण तापलं
dilip walse patil
dilip walse patilDainik Gomantk
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील मशिदींवर भोंगे आणि हनुमान चालीसावरुन वातावरण तापलेलं आहे. राज ठाकरेंच्या गुडी पाढव्याच्या सभेनंतर राज्यात विविध मुद्यांवरून वादंग सुरु झाला आहे. याच वादंगाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना यावर भाष्य केलं. तसेच, विरोधकांकडून जाणीवपूर्वक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रय़त्न केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. याचबरोबर राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील वादावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली.( maharashtra home minister dilip walse patil comment on hanuman chalisa controversy )

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “मुंबई आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अतिशय उत्तम आहे.परंतु काही लोक राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यासाठी विविध घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. तसेच राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहे. त्यांनी तसा इशाराही दिला आहे.

dilip walse patil
अंबाजोगाईमध्ये भीषण अपघात, 7 जणांनी गमवला जीव

यावर बोलताना वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्याच्या कुठल्याही प्रश्नावर मला उत्तर द्यायचं नाही. परंतु मी एवढंच या निमित्त सांगतो की, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आम्ही कुणीही या संदर्भातील कुठल्याही वेगळ्या सूचना आम्ही देत नाही. या संदर्भातील सर्व निर्णय हे पोलीस आयुक्तांनी घेऊन कारवाई करायची असते आणि त्या दृष्टीने मुंबईचे पोलीस आयुक्त कारवाई करतात.” तसेच पुढे बोलताना गृहमंत्री म्हणाले, हनुमान चालीसा कोणाला वाचायची तर अमरावतीच्या घरी वाचावी किंवा मुंबईतील किंवा दिल्लीतील घरी वाचावी.

dilip walse patil
सत्तेला माज चढला की निर्बंध लादले जातात : दामोदर मावजो

या आणि यासारख्या अनेक मग कोरोना काळात देखील मंदिर बंद आहेत, मंदिरं सुरू करा त्यावरून आरत्या, महाआरत्या कराच्या. असे वेगवेगळे प्रकार करून विरोधी पक्षाच्यावतीने आज राज्यात एक असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, की या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेला नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लावा. पण ते इतकं सोपं नाही. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित आहे.” असंही यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी बोलून दाखवलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com