Navneet Rana Arrested
Navneet Rana Arrested Dainik Gomantak

राणा दाम्पत्याला अटक; महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं

Navneet Rana and Ravi Rana Arrested News in Marathi : मातोश्रीवर जाण्याचा हट्ट आणि मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले बंड आता राणा दाम्पत्याला महागात पडले आहे.
Published on

गेले काही दिवस हनुमान चालीसा आणि नमाज पठणाचा भोंगा यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात राणा दाम्पत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक होत राणां यांच्या घरी जाण्याची भाषा करत होते तर नवनीत राणा मातोश्रीवर जाणार असल्याचे म्हणत होत्या. याच मुद्द्यावरून हे प्रकरण शिगेला पोहोचले असून मातोश्रीवर जाण्याचा हट्ट आणि मुख्यमंत्र्यांविरोधात केलेले बंड आता राणा दाम्पत्याला महागात पडले आहे. (Navneet Rana and husband Ravi Rana have been arrested by khar police)

Navneet Rana Arrested
कोणाला हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी : दिलीप वळसे पाटील

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना पोलिसांनी अटक केली आहे. खार पोलिसांनी ही कारवाई करत 153 अ या कलमाखाली राणा दाम्पत्याला आपल्या ताब्यात घेतले आहे. आक्रमक वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर आज दुपारी खार पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पण पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेले आहे. राणा दाम्पत्याला उद्या कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुमारे 10 तासांपासून चाललेल्या 'शिवसैनिक विरुद्ध राणा दाम्पत्य' या नाट्याला पूर्णविराम मिळाला असून अखेर प्रचंड मोठ्या पोलिस बंदोबस्तात मिस्टर अँड मिसेस राणांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com