Sameer Wankhede  Dainik Gomantak
महाराष्ट्र

समीर वानखेडेंना झटका, दारु व्यवसायाबाबत चुकीची महिती दिल्याने गुन्हा दाखल

समीर वानखेडे यांनी त्यांच्या सदगुरु बार आणि रेस्टॉरंटशी संबंधित दारू व्यवसायाबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमन्तक

एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आनखी मोठा झटका बसला आहे. त्यांच्या सदगुरु बार आणि रेस्टॉरंटशी संबंधित दारू व्यवसायाबाबत चुकीची माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Maharashtra State Excise department) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. समीर वानखेडे विरोधात ठाणे जिल्ह्यातील कोपरी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अल्पवयीन असताना समीर वानखेडे यांनी प्रौढ असल्याचे भासवून बार उघडण्याचा परवाना मंजुर करुन घेतला होता. अशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही तक्रार केली होती. त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sameer Wankhede accused of giving false information about liquor business)

आरोपानुसार 1996-97 मध्ये समीर वानखेडे यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते. या अर्थाने त्यांना बारचा परवाना मिळण्याचा अधिकार नव्हता. मात्र समीर वानखेडे यांनी ठाण्यातील सद्गुरू बार आणि रेस्टॉरंटच्या नावाने परवाना काढण्यासाठी स्टॅम्प पेपरवर स्वत:चे वय चुकीचे टाकले होते. म्हणजेच स्वतःबद्दल चुकीची माहिती देऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर वयाच्या 17 व्या वर्षी बारचा परवाना त्यांच्या नावावर घेतल्याच्या आरोपावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती.

यादरम्यान ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडे यांच्या नावाने सुरू असलेल्या सद्गुरू बार आणि रेस्टॉरंटचा परवाना 2 फेब्रुवारी रोजीच रद्द केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. हे बार आणि रेस्टॉरंट वाशी, नवी मुंबई येथील आहे.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाशीतील सद्गुरू बार आणि रेस्टॉरंटचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी जारी करण्यात आला, आणि काही काळानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले. हा परवाना 31 मार्च 2022 पर्यंतच राहणार होता. मात्र तूर्तास त्यासंबंधीचा परवाना रद्द करण्यात आला आणि परवाना रद्द झाल्यामुळे आता त्याचे नूतनीकरण करता येणार नाही. या रेस्टॉरंट आणि बारमध्ये देशी-विदेशी मद्यविक्रीला देखील परवानगी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT