विरोधी पक्षांना भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर काही दिवसातच, तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) रविवारी म्हणजेच आज मुंबईला (Mumbai) भेट देतील जिथे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. (Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao will meet Uddhav Thackeray and Sharad Pawar today)
तेलंगण राष्ट्र समिती (TRS) नुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला डिनरसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकी दरम्यान राष्ट्रीय राजकीय मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल, अशी माहिती पक्षाने दिली आहे.
केसीआर सकाळी मुंबईला रवाना होतील आणि संध्याकाळी हैदराबादला परततील असं ही पक्षाने या वेळी सांगितल आहे. केसीआर यांनी याआधी भाजपला चांगलेच फटकारले होते, ते म्हटले होते की त्यांची देशातून "हकालपट्टी" करावी अन्यथा देश "बरबाद" होईल. भाजपला सत्तेतून "हकाल" करण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचेही त्यांनी आवाहनही केले आहे.
भाजपच्या (BJP) विरोधात विविध विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केसीआर त्यांच्या पश्चिम बंगालच्या समकक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना भेटण्याची देखील योजना आखत आहेत.
यापूर्वी माजी पंतप्रधान एचडी देवगौडा (H. D. Deve Gowda) यांनी केसीआरला या उपक्रमासाठी पाठिंबा दर्शवला होता. तामिळनाडूचे ( Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M. K. Stalin) यांनीही सांगितले होते की, बिगर एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री लवकरच दिल्लीत अधिवेशन घेणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.