Sambhaji Raje Dainik Gomantak
महाराष्ट्र

संभाजीराजे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार

संभाजीराजे मराठा मोर्चा समन्वयकांशी चर्चा करुन घेणार निर्णय

दैनिक गोमन्तक

संभाजीराजे छत्रपती उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यापूर्वीच आपण शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी भुमिका घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे राष्ट्रवादीने आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवाराला राज्यसभेसाठी पाठींबा देणार अशी भुमिका घेतल्याने संभाजीराजे छत्रपती आता काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. (Sambhaji Raje refuses to go to ShivSena )

मिळालेल्या माहितीनुसार संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आज राजकिय वर्तूळात दिवसभर होती. संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावा त्यानंतर मेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप शिवसेनेच्यावतीनं संभाजीराजेंना देण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. आता संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याची भुमिका घेतली आहे. त्यामूळे राज्यसभेसाठी संभाजी राजे याचं भवितव्य काय हा प्रश्न कायम आहे. तसेच शिवसेना आणि महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चाच्या सर्व समन्वयकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मराठा मोर्चा समन्वयकांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी संभाजीराजेंच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशीही मागणी त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT