''त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणावं; आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय''

राज ठाकरेंना अजित पवारांचं प्रत्युत्तर
Ajit Pawar
Ajit Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात घेतलेल्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोट ठेवत निशाणा साधला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या धोरणांवर टीका करताना “तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी कमी करत आहात” असे शरद पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली. यावरुन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही केवळ आणि केवळ विकासाचे मुद्देच बोलायचे आहेत. आणि राज्यातील नागरी समस्या सोडवणे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. असे ते म्हणाले.("Call them whatever they want; We want to talk about development.)

Ajit Pawar
उगाच कशाला पावसात भिजत बसायचं म्हणत, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

अजित पवार पुढे म्हणाले की, “त्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणावं. आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंय. मी काल देखील जळगाव जामवत, शहापूर, डहाणू, सिंदखेड राजा अशा ज्या ज्या ठिकाणी गेलो, तिथे माझी भूमिका तीच राहिली आहे. ज्याच्यातून महाराष्ट्रातल्या मुलांना रोजगार निर्माण होणार आहे, ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे, ज्याच्यातून कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा हाताळण्यात पोलिसांना मदत होणार आहे, त्या गोष्टीला देखील महत्त्व देऊ ना”, असं आवाहन अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांसमोर केलं.

Ajit Pawar
अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली - राज ठाकरे

शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला. “काल शिवसेनेतलं कुणी म्हणालं की राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. याच्यावर कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com