Sakal Podcast ranked Top 5 in India Dainik Gomantak
महाराष्ट्र

‘सकाळ’चं ‘पॉडकास्ट’ देशात पहिल्या पाचमध्ये

स्थानिक भाषेतील बातम्यांचे पॉडकास्ट म्हणून लोकप्रिय होण्याचा मानही ‘सकाळ’लाच

दैनिक गोमन्तक

पुणे : रोजच्या हटके बातम्या आणि चालू घडामोडींविषयी असलेल्या ‘सकाळ’च्या ‘पॉडकास्ट’ला देशातील टॉप 10 मध्ये येण्याचा मान मिळाला असून, श्रोत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच हे साध्य होऊ शकले. यामध्ये ‘सकाळ’च्या पॉडकास्टला पाचवा क्रमांक मिळाला आहे. मराठी माध्यमातील पॉडकास्टचा हा प्रयोग वर्षभरातच श्रोत्यांच्या पसंतीला उतरला आहे. याआधी स्थानिक भाषेतील बातम्यांचे पॉडकास्ट म्हणून लोकप्रिय होण्याचा मानही ‘सकाळ’ने मिळवला आहे.

पॉडकास्टमध्ये नेमकं काय?

श्रोत्यांना ‘सकाळ’च्या ‘पॉडकास्ट’मध्ये विश्वसनीय बातम्या ऐकण्याबरोबरच हवामानाचे अपडेट, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी ते राज्यातील मोठ्या घडामोडी सविस्तर ऐकण्यास मिळतात. याबरोबरच देशातील आणि राज्यातील सर्वांत चर्चेत असलेली बातमीदेखील यामध्ये सांगितली जाते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने येणारे निर्णय, परीक्षांचं वेळापत्रक, निकालाच्या तारखा ते नोकरीच्या संधी, गृहिणींशी संबंधित किचन ते आरोग्य अशा सर्व विषयांचा समावेश या पॉडकास्टमध्ये केला जातो.

‘अनप्लग सेलिब्रिटी टॉक शो’

‘पॉडकास्ट’मध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजेच दर शनिवारी ‘अनप्लग सेलिब्रेटी टॉक शो’मध्ये मराठी आणि हिंदीतील सेलिब्रेटींशी मनमोकळ्या गप्पांचा फड रंगवला जातो. आतापर्यंत या सेलिब्रेटी टॉक शोमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद, मधुराणी गोखले, ‘शेर शिवराज’मधील अभिनेता चिन्मय मांडलेकर आदींनी सहभाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 'एफआयआर'साठीही कोर्टाची पायरी? गोवा खंडपीठाचा पोलिसांना संतप्त सवाल; पोलिस कारभारावर ओढले ताशेरे

PNG Connection New Scheme: सिलिंडर संपण्याची भीती कायमची संपली! मोदी सरकारची पीएनजी कनेक्शनसाठी मोठी घोषणा; ऑनलाइन अर्ज करा अन् लाईव्ह स्टेटस ट्रॅक करा

Kolkata Hotel Fire: "उपचारासाठी भारतात आले अन् काळाने गाठले!" कोलकात्यात हॉटेलला भीषण आग, 9 बांगलादेशींचा मृत्यू; अनेकजण जखमी

Horoscope 19 Aug 2026: बुधवार ठरणार 'या' 5 राशींसाठी खास! पैशांचा होणार पाऊस; गुंतवणुकीतूनही तगडा फायदा मिळण्याचा योग

UAEमध्ये पुन्हा क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका! हवाई संरक्षण यंत्रणा अलर्ट, नागरिकांना दिले महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT