Cannes Film Festival: फ्रान्समध्ये '53 व्या इफ्फी' च्या पोस्टरचे अनावरण

IIFI 53 Goa: ‘कान चित्रपट महोत्सवा’त, गोव्यात या वर्षी होणाऱ्या 53 व्या ‘भारतीय चित्रपट महोत्सवा’च्या (IIFI) पोस्टरचे अनावरण झाले.
Cannes Film Festiva
Cannes Film Festiva@MIB_India
Published on
Updated on

माहिती आणि प्रसारण खात्याचे केंद्रीय मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी आज, ‘कान चित्रपट महोत्सवा’त, गोव्यात या वर्षी होणाऱ्या 53 व्या ‘भारतीय चित्रपट महोत्सवा’च्या (IIFI) पोस्टरचे अनावरण केले. भारतीय सिनेमा सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण यावेळी हजर होती. (IIFI 53 Goa latest News)

अनावरण केलेल्या पोस्टरच्या गुलाबी पार्श्वभूमीवर निळसर आणि हिरव्या छ्टातला मोर देखणा दिसत होता. ‘सिनेमाचा आनंद साजरा करा’ हे पोस्टरवरचे घोषवाक्य आहे.

Cannes Film Festiva
‘टेक इट ईझी’ चित्रपट साखळी रवींद्र भवनमध्ये

गेली अनेक वर्षे इफ्फी (IIFI) भारताचा सर्वात मोठा आणि प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव बनून राहिला आहे. जगभरच्या उत्कृष्ट अर्थपूर्ण सिनेमांना पाहण्याची संधी या महोत्सवामुळे चित्रपट (Movie) रसिकांना लाभते. या वर्षीच्या इफ्फीची नांदी पोस्टरच्या अनावरणामुळे झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com