Andheri Byelection Dainik Gomantak
महाराष्ट्र

Andheri Byelection: अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके, मुरजी पटेल यांचा अर्ज

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Andheri Byelection: सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आज एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी मुख्य लढत असेलल्या उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latake) आणि भाजपकडून मुरजी पटेल (Muraji Patel) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

याशिवाय राकेश विश्वनाथ अरोरा (क्रांतिकारी जय हिंद सेना) आणि (हिंदुस्तान जनता पार्टी), मिलिंद काशिनाथ कांबळे (अपक्ष) आणि नीना गणपत खेडेकर (अपक्ष) यांनी आपले नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे.

ठाकरे गटाच्या वतीने शक्तीप्रदर्शन करत ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे समर्थक आणि नेते उपस्थित होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. तसेच, काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप देखील उपस्थित होते. ठाकरे गटाच्या वतीने ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित असल्याचे नेते सांगत आहेत.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पाला वंदन करा... अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT