Maharashtra Politics : '...तर उद्धव ठाकरे आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते'; अजित पवारांचा टोला

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांची मदत घेतली असती, तर आज ते मुख्यमंत्री असते, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
Maharashtra Politics
Maharashtra Politics Dainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Politics : शिवसेनेतील बंडखोरी आणि राजकीय पेचप्रसंगाच्या काळात उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांची मदत घेतली असती, तर आज ते मुख्यमंत्री असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जेव्हा शिवसेनेच्या 15 आमदारांनी पक्षाविरोधात बंड केले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मदत घ्यायला हवी होती. अशा राजकीय परिस्थितींसाठी ते मास्टर आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संपर्क साधला असता तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते, असे पवार म्हणाले.

(maharashtra politics ajit pawar slams uddhav thackeray)

Maharashtra Politics
India vs Pakistan : गौतम गंभीरचा टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला; आफ्रिदीविरुद्ध सांगितली रणनीती

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, असे शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले. छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी या गोष्टी सांगितल्या. या कार्यक्रमाला शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेते उपस्थित होते. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता मी असा माणूस झालो आहे, ज्याला कोणताही धक्का वाटत नाही. पण भुजबळांनी शिवसेना सोडल्यावर आमच्या कुटुंबाला धक्का बसला हे मला मान्यच आहे. आमच्या कुटुंबातील एक सदस्य आम्हाला सोडून गेला हे सत्य फार काळ आमच्या पचनी पडले नाही.

यापूर्वी, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेतील भुजबळांची भूमिका आणि 2002 मध्ये अडचणीत आलेल्या विलासराव देशमुख सरकारला वाचवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका कशी बजावली, याची आठवण करून दिली. अजित पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी भुजबळांची मदत घेतली असती तर ते आजही मुख्यमंत्री आता असते."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com