Chandrakant Patil, Rupali Patil Dainik Gomantak
महाराष्ट्र

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं...''

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका

दैनिक गोमन्तक

“राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. मात्र कोल्हापूर येथील पोटनिवडणूक चंद्रकांत पाटील लढले नाहीत. असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, चंद्रकांत पाटील यांना तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांना खोचक सल्ला देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे. (Rupali Patil criticizes Chandrakant Patil )

चंद्रकांत पाटील यांनी निवडणुक संदर्भात केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की “राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, यानंतर कोल्हापूर येथील पोटनिवडणूक चंद्रकांत पाटील यांच्या भाजप उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाहीत”, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राजकीय संस्कृती संपवण्याचं काम केल्याची टीका रुपाली पाटील यांनी केली आहे. “त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी चुलीत जा, मसणात जा, अशा पद्धतीचे विधान केले. त्यामुळे त्यांनी राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला निधी आणि तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट कुरिअरने पाठवत आहोत”, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT