Representative image Wikimedia Commons
महाराष्ट्र

रेल्वेखाली आला पण थोडक्यात वाचला, बोरीवली स्टेशनचा Video Viral

मुंबईतील (Mumbai) बोरिवली (Borivali) रेल्वे स्थानकावरचा एक व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे

दैनिक गोमन्तक

बोरिवली: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील (Mumbai) बोरिवली (Borivali) रेल्वे स्थानकावरचा एक व्हिडिओ (Video) व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस चालत्या ट्रेनमधून खाली पडला. व्हिडिओमध्ये पाहता येईल की ही घटना घडली तेव्हा रेल्वेगाडी वेगात होती. जेव्हा तो माणूस खाली जाण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये असलेल्या गॅपमध्ये अडकला. या दरम्यान, रेल्वे पोलिस दलाच्या (RPF) जवानाची नजर त्या व्यक्तीकडे गेली. त्याने धावत जाऊन त्या माणसाला बाहेर काढले आणि वाचविले. ही घटना 29 जूनची असल्यांच सांगितली जात आहे. (RPF constable saved life of a passenger who fell while trying to get down from a running at Borivali Railway Station)

व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचताच, ती व्यक्ती वेगवान चालणार्‍या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर पडते दरम्यांन ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये अडकते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबलचे खूप कौतुक होत आहे. व्हिडिओमध्ये आरपीएफ जवानसमवेत आणखी एक व्यक्ती मदतीसाठी धावून आला आहे.

मध्य रेल्वेनेही याबाबत निवेदन जारी केले आहे. 'एका आरपीएफ कॉन्स्टेबलने २९ जून रोजी मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकात धाव घेण्याच्या प्रयत्नात असताना पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचवला. जेव्हा कॉन्स्टेबलने त्याला ओढले तेव्हा प्रवासी गाडी आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपजवळ होता.

दाराजवळ उभे राहणे किंवा फिरत्या ट्रेनमध्ये जाण्याचा प्रयत्न करणे प्राणघातक असल्याचे माहिती असुनसुद्दा लोकं ही रिस्क घेतात. अनेकदा लोक घाईघाईने चालत्या ट्रेनमधून खाली उतरतात आणि अपघातांचे बळी ठरतात. हा व्हिडिओमध्ये चालत्या ट्रेनमधून उडी मारणे किती धोकादायक असू शकते याची कल्पना देते. लोकांनी अशा घटनांपासून शिकले पाहिजे आणि चालणार्‍या ट्रेनमध्ये बसण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करु नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT