Viral Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

Video: स्कूटरवर जोडप्याचा खुल्लमखुल्ला रोमान्स, व्हिडिओ व्हायरल; संतप्त लोकांनी...

Viral Video: काही लोक सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करतात ज्या त्यांनी करु नये असे अपेक्षित असते.

Manish Jadhav

Viral Video: काही लोक सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी करतात ज्या त्यांनी करु नये असे अपेक्षित असते. त्यांच्या कृतींचा त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर याचा परिणाम होतो याविषयी ते अनभिज्ञ असतात. अशीच एक घटना देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून समोर आली आहे, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जोडप्याच्या या कृत्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, एक जोडपे स्कूटरवर रोमान्स करताना दिसले. ही घटना मुंबईतील वांद्रे येथील असल्याची माहिती आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक जोडपे स्कूटरवरुन जाताना दिसत आहे. बॉयफ्रेंड स्कूटर चालवताना दिसत आहे तर गर्लफ्रेंड त्याच्या मांडीवर उलटी बसलेली आहे. दोघांनीही शाल पांघरली आहे. हे जोडपे रोमान्स करत असताना दुसऱ्याने त्यांचा व्हिडिओ बनवला.

दुसरीकडे, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे जोडपे घट्ट मिठी मारताना दिसत आहे. दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ते हेल्मेट न घालता प्रवास करत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तूफान व्हायरल झाला. कोणीतरी हा व्हिडिओ शेअर करुन मुंबई पोलिसांना टॅग केले. या जोडप्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्याने केली. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्संनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. एका यूजरने म्हटले की, असा प्रवास करणे केवळ त्यांच्यासाठीच नाही तर इतरांसाठीही धोक्याचे आहे. तर दुसऱ्या म्हटले की, त्यांना पाहिल्यानंतर जर इतर लोकही असे वागले तर त्याला तेही जबाबदार असतील. दुसऱ्याने पोलिसांकडे या जोडप्यावर कारवाई करण्याची मागणी केली. इतर यूजर्संनी म्हटले की, अशा कृतीमुळे रस्त्यावर चालणाऱ्या इतर लोकांना त्रास होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT