Viral Video: पायलटच्या अंगावर धावून गेला प्रवासी, गोव्याला येणाऱ्या विमानात झटापटीचा व्हिडिओ व्हायरल

दिल्ली ते गोवा फ्लाइटमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Delhi Goa Flight Viral Video
Delhi Goa Flight Viral VideoDainik Gomantak

Delhi Goa Flight Viral Video: इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्लाइटमधील एक प्रवासी पायलटवर हल्ला करताना दिसत आहे. पायलट विमानाला उशीर झाल्याची घोषणा करत होता. यावेळी एका प्रवाशाने त्यांच्यावर हल्ला केला.

दिल्ली ते गोवा फ्लाइटमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात पिवळ्या रंगाचा हुडी घातलेला एक संतप्त प्रवासी पायलटच्या दिशेने धावत असून त्याला चापट मारताना दिसत आहे.

यावेळी येथे असलेल्या एअर होस्टेसने या प्रवाशाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असता, ती पायलटला म्हणताना ऐकू येते आहे: "नही चलना तो मत चलना, बोल दे (तुम्हाला विमान उडवायचे नसेल तर नका करु)".

यावर एक फ्लाइट अटेंडंट, "सर, तुम्ही असे करू शकत नाही," असे म्हणाताना दिसत आहे.

फ्लाइटमधील इतर प्रवाशांना देखील या घटनेचा धक्का बसला. व्हिडिओच्या शेवटी एक निळा हुडी घातलेला माणूस त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. हा व्हिडिओ एका युझरने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.

EMSOS चे CEO आणि सह-संस्थापक यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) यांना टॅग करून निराशा व्यक्त केलीय.

"विमान उशीर झाल्याची घोषणा करत असताना एका प्रवाशाने इंडिगोच्या पायलटला मारहाण केली. तो व्यक्ती शेवटच्या रांगेतून धावत आला आणि क्रूच्या जागी आलेल्या कॅप्टनला ठोसा मारला," असे ट्विट त्यांनी केले आहे.

Delhi Goa Flight Viral Video
Goa Crime News : नौदलाच्‍या अधिकाऱ्यांवरही दबाव आणण्‍याचे प्रयत्‍न सुरू; वास्‍को जळीतकांड

एनएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एव्हिएशन सिक्युरिटी एजन्सीने या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात तपास सुरू केला आहे. इंडिगोची फ्लाइट (6E-2175) धुक्यामुळे उशीर होत असताना एका प्रवाशाने पायलटला धक्काबुक्की केली. काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वैमानिक विमान उशीराची घोषणा करत असताना प्रवाशाने पायलटला मारहाण केली. साहिल कटारिया असे या प्रवाशाचे नाव आहे.

इंडिगोने या प्रवाशाविरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) डीसीपीच्या म्हणण्यानुसार, इंडिगो एअरलाइन्सने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनही डीसीपींनी दिले आहे.

दाट धुके आणि खराब हवामानामुळे उत्तर आणि मध्य भारतातील विमान उड्डाण ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असताना ही घटना घडली. दाट धुक्याने रविवारी राष्ट्रीय राजधानीत सुमारे 11 तास अडकून पडल्याने हजारो प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com