Rohit Sharma Viral Video Dainik Gomantak
महाराष्ट्र

Rohit Sharma Viral Video: ट्रॅफिकमध्ये अडकूनही 'मुंबईचा राजा'नं जिंकली मनं; छोटासा हावभाव चाहत्यासाठी ठरलं मोठं 'Surprise'

Rohit Sharma Mumbai Traffic: टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माचे लाखो चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. हिटमॅनचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Sameer Amunekar

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि अलीकडच्या टी-२० विश्वचषकाचा विजेता कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लाखो चाहते नेहमीच 'हिटमॅन'ची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात आणि यावेळी चाहत्यांचा आनंद अधिकच द्विगुणीत झाला. मुंबईच्या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलेला रोहित आपल्या खास अंदाजात दिसून आला.

‘मायानगरी’ मुंबईची ट्रॅफिक समस्या सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, या जाममध्ये अडकलेल्या रोहित शर्माने चाहत्यांप्रती दाखवलेला हावभाव सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित आपल्या आलिशान लॅम्बोर्गिनीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसतो. अचानक रस्ता बंद झाल्याने वाहन थांबले आणि त्याचवेळी एका चाहत्याने दुरून हिटमॅनकडे हात हलवून आपला आनंद व्यक्त केला.

त्यावर रोहितनेही मनमोकळेपणाने प्रतिक्रिया देत थम्ब्स अपचा हावभाव केला. त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी दिसणारे हास्य पाहून चाहते भारावून गेले. काही क्षणांच्या या छोट्याशा घटनेने त्या चाहत्याचा दिवस संस्मरणीय झाला. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत असून चाहत्यांनी भारतीय कर्णधाराच्या साधेपणाचे आणि मनमोकळ्या स्वभावाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, अलीकडेच रोहित शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सराव करतानाचे काही फोटो शेअर केले होते. यात तो माजी फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहे. कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता रोहित एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती घेणार, अशा बातम्या जोर धरू लागल्या होत्या. मात्र बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अशा सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. शुक्ला यांनी स्पष्ट केले की, या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही आणि चाहत्यांनी अशा अटकळींवर विश्वास ठेवू नये.

हिटमॅनची ही खास शैली आणि चाहत्यांप्रती असलेली जिव्हाळ्याची वागणूक पुन्हा एकदा सर्वांना भावली आहे. मैदानावरच्या त्याच्या दमदार कामगिरीसोबतच मैदानाबाहेरही रोहित शर्मा आपल्या नम्रतेमुळे चाहत्यांच्या हृदयात अधिराज्य गाजवत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

IND vs PAK: भारत 'पाकिस्तान'सोबत क्रिकेट सामना का खेळतंय? BCCI नं स्पष्ट केली भूमिका

India vs Pakistan: भारत–पाक सामन्यावरून देशात गोंधळाचं वातावरण, कुठं आंदोलन तर कुठं टीम इंडियाच्या विजयासाठी पूजा-अर्चना Watch Video

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

SCROLL FOR NEXT