रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील कोरोना (Covid 19) टास्क फोर्स (Task Force) आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध कडक

राज्य सरकारची नवीन कोरोनाची (Covid 19) मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मास्क न घातल्यास 500 रुपये दंड, थिएटर, बँक्वेट हॉल, ऑडिटोरियममध्ये 50 टक्के लोकांना परवानगी.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) सापडलेल्या कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराने पुन्हा एकदा जगभरात कोरोनाची (Covid 19) दहशत वाढवली आहे. डेल्टा व्हेरियंटपेक्षा दहापट वेगाने वाढणाऱ्या या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने देशासह महाराष्ट्र सरकारचीही (Government of Maharashtra) चिंता वाढवली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील कोरोना टास्क फोर्स (Task Force) आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा राज्य लॉकडाऊनकडे तर जात नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. दरम्यान, राज्य सरकारची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

आता ज्या लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे, म्हणजे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच सार्वजनिक वाहनांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल. त्याचप्रमाणे, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच मॉल, सभागृह, कार्यक्रमांमध्ये प्रवेश दिला जाईल. राज्य सरकारने युनिव्हर्सल पास दिले आहेत. प्रवास करताना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.

मास्क न घातल्यास 500 रुपये दंड

मास्क वापरण्याचे नियम काटेकोरपणे पाळले जातील. मास्क न वापरताना कोणी आढळून आल्यास त्यांच्याकडून 500 रुपये दंड आकारला जाईल. दुकानात मास्कशिवाय ग्राहक आढळल्यास दुकानदारांकडून 10 हजार रुपये आकारले जातील. तसेच मॉलमध्ये मास्कशिवाय कोणी आढळल्यास मॉल मालकाकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. राजकीय सभा, कार्यक्रमांमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास 50 हजार रुपये दंड वसूल केला जाईल. टॅक्सी किंवा खाजगी वाहनांमध्ये मास्क न वापरल्यास प्रवाशांकडून 500 रुपये आणि वाहनधारकाकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

IND v NZ सामन्यासाठी, स्टेडियममध्ये केवळ 25 टक्के प्रेक्षकांच्या परवानगी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर केवळ 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या व्यक्तींची RTPCR चाचणी 72 तासांच्या आत निगेटिव्ह होणे आवश्यक आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दक्षिण आफ्रिकेसह ज्या देशांत कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराचे रुग्ण आढळले आहेत, त्या देशांतील विमानसेवा रद्द करण्याचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र सरकारची नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्बंध

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्यांनी रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांकडे लसीचे प्रमाणपत्र नसेल तर RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट 72 तासांच्या आत घेऊन जाणे आवश्यक आहे.

थिएटर, बँक्वेट हॉल, ऑडिटोरियममध्ये 50 टक्के लोकांना परवानगी

थिएटर, बँक्वेट हॉल, ऑडिटोरियममध्ये 50 टक्के लोकांच्या उपस्थितीला मान्यता दिली जाईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालण्यात येणार असून असे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सामाजिक अंतराचे नियम पाळणे आवश्यक असून एकमेकांपासून सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकारांचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने एक पत्र लिहून राज्यांना इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी आणि चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना यांसारख्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विशेष तपासणी करण्यात यावी. असे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT