Old Soldier Bazar Karachi Blast
Old Soldier Bazar Karachi BlastDainik Gomantak

Pakistan Blast: पाकिस्तान हादरलं! कराचीत भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 9 मुलांचाही समावेश Watch Video

Old Soldier Bazar Karachi Blast: पाकिस्तानमधील कराची शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published on

Old Soldier Bazar Karachi Blast: पाकिस्तानमधील कराची शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली. गुरुवारी (19 फेब्रुवारी) पहाटे एका निवासी इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट संशयास्पद गॅस गळतीमुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे, आज पाकिस्तानात रमझान महिन्याचा पहिला दिवस असल्याने पहाटे 'सहरी'साठी लोक जागे असतानाच ही दुर्घटना घडली, ज्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराचीच्या 'ओल्ड सोल्जर बाजार' परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पहाटे 4:30 च्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की इमारतीचा एक मोठा भाग पत्त्यासारखा कोसळला. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, रुग्णालयात उपचार सुरु असताना इतर दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 14 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे; 2 ते 17 वयोगटातील 9 मुलांचा या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमींमध्येही 7 मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचे जवान अजूनही ढिगाऱ्याखाली शोधमोहीम राबवत आहेत.


Old Soldier Bazar Karachi Blast
Pakistan: पाकिस्तानमध्ये 'संवैधानिक तख्तापलट'चा धोका! न्यायव्यवस्थेची स्वायत्तता धोक्यात; UNच्या धारधार टीकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ VIDEO

कराचीसारख्या (Karachi) मोठ्या शहरात गॅसची मोठी टंचाई असल्याने कमी उत्पन्न असलेल्या भागातील लोक मोठ्या प्रमाणावर एलपीजी सिलिंडरचा वापर करतात. अनेकदा जुने सिलिंडर किंवा गळतीमुळे असे अपघात घडतात. कराचीमधील गेल्या काही दिवसांतील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. गेल्याच महिन्यात सदर भागातील 'गुल शॉपिंग प्लाझा'च्या बेसमेंटमध्ये लागलेल्या आगीत 79 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. रमझानच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कराची शहरात शोककळा पसरली असून पाकिस्तानातील रहिवासी इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com