भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा कोरोनाच्या विळख्यात, रद्द होणार की पुढे जाणार?

नेदरलँड्सने माघार घेतल्याने भारतीय संघाच्या दौऱ्यावर याचा परिणाम होऊ शकतो. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) उत्तरेकडील भागात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) उत्तरेकडील भागात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) उत्तरेकडील भागात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील कसोटी मालिका (Test series) सुरू होऊन अवघे दोनच दिवस होत नाही तोच आता टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यावर कोरोनाचे (Covid 19) सावट दिसू लागले आहेत. यामुळे हा दौरा अडचणीत आला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून, तेथे कोरोनाचा नवीन व्हेरियंट सापडला आहे. त्यामुळे भारत विरुध्द दक्षिण अफ्रिका यांच्यातील मालिका धोक्यात आली आहे. या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत, कोविडच्या नवीन प्रकारामुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेची नेदरलँड्स विरुद्धची वनडे मालिका देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) उत्तरेकडील भागात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.
IND vs NZ :‘मेरी मर्जी’… कसोटी सामन्यावेळी प्रेक्षकाचे 'गुटखा प्रेम' व्हायरल

भारतीय संघाच्या दौऱ्यापूर्वी नेदरलँडचा संघ दक्षिण आफ्रिकेत आहे. उभय संघांमध्ये 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, 26 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हे दोन देश द्विपक्षीय मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र त्याची सुरुवातच कोरोनाने झाली आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही संघांमधील मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळवले जाणार नाहीत आणि पहिला सामना संपल्यानंतर डच संघ आपल्या देशात परत जाणार आहे.

सीएसएशी बोलल्यानंतर बीसीसीआय पुढील पाऊल उचलणार

नेदरलँड्सने माघार घेतल्याने भारतीय संघाच्या दौऱ्यावर याचा परिणाम होऊ शकतो. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेकडील भागात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. कसोटी मालिकेतील दोन प्रमुख ठिकाणे जोहान्सबर्ग आणि प्रिटोरियामध्ये त्यांचा प्रभाव दिसून येतो. पीटीआयने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, “जोपर्यंत आम्हाला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून तेथील परिस्थितीची माहिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या पुढील निर्णय सांगू शकणार नाही. सध्याच्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ मुंबईत न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर 8 किंवा 9 डिसेंबरला रवाना होणार आहे.

भारतीय बोर्ड सध्या या प्रकरणी आपले पुढील पाऊल स्पष्ट करत नाही, परंतु असे मानले जाते की BCCI आफ्रिकन बोर्डाशी बोलणार आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराबाबत जगाला आधीच सावध करण्यात आले आहे. युनायटेड किंगडमने पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला रेड लिस्टमध्ये टाकले आहे. तर भारत सरकारने सर्व राज्यांना दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) उत्तरेकडील भागात कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत.
जर्मनीने दक्षिण आफ्रिकेला व्हायरस वेरिएंट क्षेत्र म्हणून केले घोषित!

कडक विलगिकरणात ठेवणे आवश्यक

बदललेल्या परिस्थितीत खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत कडक क्वारंटाईनमध्ये वेळ घालवावा लागू शकतो, अशी भीती बीसीसीआयला वाटत आहे. बोर्डच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, “पूर्वी कठोर विलगिकरणात ठेवण्याची कोणतीही तरतूद नव्हती पण खेळाडू बायो बबलमध्येच राहात होते. आता प्रकरणे वाढत आहेत आणि युरोपियन युनियनने देखील तात्पुरती उड्डाणे रद्द केली आहेत, आम्हाला यावर देखील लक्ष देणे गरजेचे आहे.

भारत अ मालिकेवर काय होणार परिणाम?

भारतीय संघाच्या आफ्रिका दौऱ्यापूर्वी आणखी एक भारतीय संघ तेथे आहे. भारत-अ संघ दक्षिण आफ्रिका-अ संघाविरुद्ध 4 दिवसीय प्रथम श्रेणी सामना खेळत आहे. उभय संघांमधील पहिला सामना ब्लोमफॉन्टेन येथे खेळला जात होता. पण या दौऱ्यावरही विषाणूचा काही परिणाम होईल का, याबाबत बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले, "येथे पोहोचल्यावर आम्हाला कठोर विलगीकरणातून जावे लागले नाही कारण आम्ही चार्टर्ड विमानाने आलो होतो, आणि येथे राहत होतो. कोरोनाची नवीन प्रकरणे आढळल्यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय पथकाने येथे आमच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. आम्हाला सांगण्यात आले आहे की काळजी करण्यासारखे काही नाही कारण ज्या भागात प्रकरणे आढळली आहेत ते ब्लोमफॉन्टेनपासून खूप दूर आहे. जिथे आम्हाला आमचे पुढील दोन सामने देखील खेळायचे आहेत.

17 डिसेंबरपासून होणार मालिका सुरूवात?

टीम इंडियाला पुढील महिन्यापासून दक्षिण आफ्रिकेत 3 कसोटी सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 4 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया 8 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. त्यानंतर 17 डिसेंबरपासून कसोटी सामन्याने मालिकेला सुरुवात होईल, असे मानले जात आहे. भारतीय संघ या दौऱ्यासाठी सुमारे दीड महिना दक्षिण आफ्रिकेत असेल. जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, पार्ल आणि केपटाऊन या चार ठिकाणी हे सामने खेळविण्यात येणार आहे. परंतु आफ्रिकन देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हे वेळापत्रक बदलू शकते असे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com