कोरोना रुग्ण  Dainik Gomantak
महाराष्ट्र

औरंगाबाद रुग्णालयात बोगस कोरोना रुग्णांची भरती

खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमन्तक

औरंगाबाद: कोरोना (Covid 19 )सेंटरमध्ये चक्क बोगस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार औरंगाबाद मध्ये उघडकीस आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोकाट फिरत आहेत. त्यांच्याऐवजी बोगस कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बोगस कोरोना बाधित रुग्णांना 10 हजार रुपये देऊन कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

मेलट्रॉन कोविड रुग्णालयात (hospital) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal Corporation) पोलिसांत (police) तक्रार दाखल केली असून बोगस रुग्ण, तसेच पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एका उद्यानाच्या बाहेर कोरोनाची चाचणी केली असताना त्यामध्ये दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर या दोन्ही तरुणांनी आपल्या ऐवजी इतर दोन तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले.

या दोन तरुणांच्या लक्षात आले की, आपल्याला कोरोनाबाधित रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले आहेत. त्यावेळी या दोन्ही तरुणांनी गोंधळ घालत सुटका करण्याची मागणी केली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आला.

रुग्णालयात दाखल होण्यासाठी आपल्याला 10 दिवसांसाठी 10 हजार रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते अशी माहिती संबंधित दोन्ही तरुणांना दिली. असे असले तरी खरोखर जे रुग्ण कोविड बाधित आहेत ते मात्र, अद्याप फरार आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेकडून या संपूर्ण प्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता खरे पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या संपूर्ण घटनेने औरंगाबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT