Special Audit of Mumbai Goa Highway work: | Minister Ravindra Chavhan  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाच्या विलंबाची कारणे येणार समोर; कामाचे होणार विशेष ऑडिट

Mumbai Goa Highway: महाराष्ट्राचे सावर्जनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश

Akshay Nirmale

Minister Ravindra Chavhan on Mumbai Goa Highway work: गेल्या 12 वर्षांपासून काम सुरू असूनही अद्याप अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.

मंत्री चव्हाण यांनी रविवारी महामार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. तथापि, यावेळी वाहतूक कोंडीमुळे त्यांना दोन तासांहून अधिक काळ अडकून पडावे लागले. त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी ही घोषणा केली.

मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या 12 वर्षात झालेले काम आणि प्रकल्पाला झालेल्या विलंबाची कारणे तपासण्यासाठी विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी रविवारपासून पुढील महिन्याचा गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे.

डोंबिवली शहरातील एका कार्यक्रमानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रकल्पासाठी मोठा निधी वितरित करण्यात आला आहे, मात्र काही कारणास्तव कामाला विलंब होत आहे. या वर्षाअखेरीस महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे मंत्री म्हणाले.

आगामी गणेशोत्सवासाठी कोकणातील प्रवाशांसाठी महामार्गाची एक लेन खुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून मालमत्तेचे नुकसान केले, हा अनुचित प्रकार असल्याचेही ते म्हणाले.

प्रकल्पाला उशीर का होतोय यावर चर्चा करण्यापेक्षा कोकणातील जनतेने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारला मदत करावी, असेही मंत्री चव्हाण म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For job Scam: कॅश फॉर जॉब प्रकरणातील संशयित शिवम पाटीलला कोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

Goa Live Updates Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक; मतदानाला सुरुवात

Rashi Bhavishya 20 November 2024: आज तुमचा प्रवास घडणार आहे, आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्या; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Mormugao Coal: मुरगावची कोळसा प्रदूषणापासून सुटका होणार? कंपन्यांनी योजले प्रदूषण नियंत्रणाचे उपाय; ‘जेएसडब्ल्यू’ने उभारला डोम

Land Grabbing Case: आणखी चार भूखंड मालमत्ता हडप केल्या! सिद्दिकीची कबुली; गोव्यासह दिल्ली, पुणे, हैदराबादेत मिळून 15 गुन्हे

SCROLL FOR NEXT