Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

त्यांना पहाटेची पापकृत्य करण्याची फार सवय - संजय राऊत

ईडी, सीबीआय प्रमाणे निवडणूक यंत्रणा वापरल्या जातात ?

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप - प्रत्यारोपाच्या फैरींनी पार ढवळून निघाले आहे. निवडणुकीपुर्वी आपला उमेदवार निवडूण येणार म्हणत विजयाच्या आरोळ्या ठोकणारे नेते आता जय - पराजयाच्या घडामोडींनी एकमेकांवर राळ फेकण्यात व्यस्त आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना पहाटेची पापकृत्य करण्याची फार सवय आहे. अशा शब्दात भाजपला टोला लगावला आहे. (Rajya Sabha elections: Shiv Sena leader Sanjay Raut criticizes BJP)

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडच्या काही अपक्षांची मतं फुटल्याने शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे.

मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेताना संजय राऊत म्हणाले की, मतदानावेळी धार्मिक प्रदर्शन करायचं नसतं हे माहिती असूनही अमरावतीचे एक शहाणे जे उद्योग करत होते, ते आक्षेपार्ह होतं. त्यांचंही मत घटनेनुसार बाद व्हायला हवं. पण फक्त आमचं मत बाद करून रात्री उशीरा आणि पहाटे काही गोष्टी करण्यात आल्या. यांना पापकृत्य करण्याची पहाटेची फार सवय आहे. पहाटेपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू होता. त्या उपक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राचा एकदा कायमचा घोडेबाजार करून टाका”, असं राऊत यावेळी म्हणाले.

केंद्रीय यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कसं काम करतायत ? हे आम्ही डोळ्यांनी पाहात होतो. कुठे ईडी, कुठे सीबीआय, कुठे अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा वापरल्या जातात का ? अशी शंका येते. आमचा एक उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ समोरच्यांनी दैदिप्यमान विजय मिळवला असा नाही”, असं राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी दगा दिलेल्यांना बघुन घेण्याची भाषा केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची नावं आमच्याकडे आहेत. आम्हाला माहितीये कुणी आम्हाला मतं दिलेली नाहीत. ठीक आहे. पाहुयात. असे ते यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: 'कला अकादमी' सुसज्ज करण्याचे काम IIT Mumbai कडे; सल्लागार म्‍हणून नेमणूक, लवकरच अहवाल करणार सादर

Goa Sand Mining: रेती परवाने रुतले CRZ मध्ये, NIO चा प्रतिकूल अहवाल; सरकारचे ‘सँडविच’, केंद्रीय मंत्रालयाने घातली बंदी

Ganeshotsav 2025: नितेश राणेंच्या मागणीला केंद्राचा 'ग्रीन' सिग्नल, गणेशोत्सव काळात 'कोकणात' धावणार 16 डब्यांची 'वंदे भारत एक्स्प्रेस'

Rashi Bhavishya 24 August 2025: सन्मान मिळण्याची शक्यता, महत्त्वाचे निर्णय घेण्यास घाई करू नका; आजचा दिवस उत्साही

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

SCROLL FOR NEXT