CM Yogi Adityanath Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राला 'योगींची' गरज, राज ठाकरेंनी योगी सरकारचं केलं तोंडभरुन कौतुक

महाराष्ट्रातून सुरु झालेल्या लाऊडस्पीकरच्या (Loudspeaker) वादानं अवघा देश ढवळून निघाला आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातून सुरु झालेल्या लाऊडस्पीकरच्या वादानं अवघा देश ढवळून निघाला आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. त्याचबरोबर कोण किती धार्माचा पुजारी हे दाखवण्याचाही प्रयत्न सुरु झाला आहे. मशिदींवरुन भोंगे उतरवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर राज्यासह देशभरातील वातावरण चांगलंच तापलं. (Raj Thackeray praises CM Yogi Adityanath's decision to remove loudspeakers from religious places)

यातच आता उत्तरप्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. योगींच्या या निर्णयाचं आता राज ठाकरेंनी तोंड भरुन कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील ट्वीटरवरुन ट्वीट करत म्हटलयं की, ''यूपीतील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. दुसरीकडे महाराष्ट्रात (Maharashtra) कुणीचं योगी नाही, आहेत ते फक्त सत्ता लोलुप. ठाकरे सरकारला लवकरच सद्बुद्धी मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.''

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ट्वीट करताना #Azaan आणि #Loudspeakers हे दोन हॅशटॅग दिले आहेत. त्यासबोतच अभिनंदनाचं पत्र मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषामध्ये लिहून ट्वीट केलं आहे. भोंगे हटवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला तीन मे चा अल्टिमेटमम दिला आहे. त्याचबरोबर भोंगे हटवण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तात्काळ निर्णय घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राज्यासह देशभरातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT