महाराष्ट्र - महाराष्ट्रात मान्सूनमुळे (Monsoon) पेरणीस पोषक पाऊस पडल्याने खरीप पिकांच्या लागवडीला (Planting of crops) सुरुवात झाली आहे. गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसाने आज लख्ख ऊन पडल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण तयार झाले आहे. मान्सूनच्या (Monsoon) पहिल्या पावसात अनेक ठिकाणच्या धरणांची (Dam) पाण्याची पातळी वाढली आहे. वारणा, तारळी आणि ऊयरमोडी या धरणातील पाण्याची पातळी निम्म्याहुन अधिक भरली आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे कोयना धरण 6 (880), कुभी 19 (1,158), धुदगंगा 21 (732), कावडी 6 (620), एवढा मिलीमीटर पाऊस झाला आहे. (Rains receded in western Maharashtra)
दरम्यान, गोव्यात पावसाची शक्यता नसतांना देखील शनिवारी सकाळच्या सुमारास राज्याला पावसाने (Heavy rain) झोडपले. दुपारनंतर मात्र उघडझाप सुरू होती. सोमवारपर्यंत अशाच प्रकारचे वातावरण (Atmosphere) राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल, असे हवामान वेधशाळेने (weather observatory) माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात पावसाचा जोर ओसरल आहे, पण वादळी वारे
(Stormy winds) कायम राहतील, असा हवामान वेधशाळेने अंदाज दर्शविला होता. मात्र पुन्हा एकदा पावसाने या अंदाजाला हुलकावणी दिली.
मान्सूनचा गोव्यात आगमन झाल्यापासून कमी कालावधीत मुसळधार पाऊस झाला आहे. शनिवारी समुद्र (sea) खवळलेला असून पाच ते सहा मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. वादळी वाऱ्याचाही जोर होता. सकाळपासून तब्बल 117.0 मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्याच्या विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत काणकोण (Canacona) परिसरात पावसाचा जोर घटला होता, पण आज तेथेही तब्बल 73.0 मि.मी. पावसाची नोंद झाली. पणजी शहर आणि परिसराला देखील पावसाने झोडपून काढले. पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
‘यलो अलर्ट’(yellow alert) असतानाही राज्यात म्हणावी तशी पर्जन्यवृष्टी झाली नाही.
पावसाचा जोर नसल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांना (Farm) दणक्यात सुरवात केली. गेल्या पाच दिवसांपासून शेतीची कामे रखडली होती. गेले दोन दिवस पावसाने हवामान वेधशाळेच्या अंदाजाला हुलकावणी दिली होती. रविवारी देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असताना वाळपई, काणकोण आणि पेडणे वगळता इतर भागात पावसाने दिवसभर उसंत घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.