Raigad Bus Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raigad Bus Accident: रायगडमध्ये बस दरीत कोसळली ; 13 जणांचा मृत्यू, 25 जखमी

या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Puja Bonkile

Raigad Bus Accident: रायगडमधील खोपोली परिसरात शनिवारी (15 एप्रिल) ला बस दरीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू आहे. या घटनेची माहिती रायगडच्या एसपींनी दिली आहे.

रायगडच्या खोपोली भागात बस दरीत कोसळून 13 जण ठार तर 29 जण जखमी झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. बचाव कार्य पूर्ण झाले आहे.रायगडचे एसपी सोमनाथ घाडगे यांनी सांगितले की, ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. आतापर्यंत 29 जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस पुण्याहून येत होती.

पोलिसांनी सांगितले की, खासगी बस पुण्याहून मुंबईकडे जात असताना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील शिंगरोबा मंदिराजवळ दरीत कोसळली.

पोलिसांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि एसपी आणि बचाव कार्यात गुंतलेल्या टीमशीही चर्चा केली. मृतांच्या नातेवाइकांना 5 लाख रुपयांची भरपाई आणि जखमींवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. सीएमओकडून ही माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Former CM Ravi Naik Dies : माजी मुख्यमंत्र्यांना अखेरची मानवंदना! गोव्यात तीन दिवसांचा दुखवटा, एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ravindra Bhavan: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रवींद्र भवनचे सभागृह होणार खुले, मंत्री कामत यांनी दिली माहिती

Goa AAP: सासष्टीत 9 मतदारसंघांत ‘आप’ देणार उमेदवार! काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी; गोवा फॉरवर्डही रिंगणात

नव्वदमध्ये गोव्यातील गुन्हेगार रवींच्या नावाने थरथर कापत होते; महाराष्ट्रापर्यंत पोहोचला होता दबदबा

अग्रलेख: दरोडेखोरांना गोव्‍यात साह्य कुणी केले?

SCROLL FOR NEXT