Maharashtra News Update| Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

Watch Video: मुंबईतील विलेपार्लेत आठ ते दहा घरे कोसळली,रहिवाशांचा मेट्रोच्या कामावर आरोप

Maharashtra News Update: विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात मेट्रोचे काम सुरू असून आजुबाजूच्या घरांना तडे गेले आहेत.

दैनिक गोमन्तक

मुंबईत विलेपार्ले येथील आठ ते दहा घरे कोसळली आहेत. तर 40 पेक्षा जास्त घरांच्या भितींना तडे गेले आहेत. मेट्रोच्या कामांमुळे घरांना हादरे बसत असल्याचा रहिवाशांनी आरोप केला आहे. विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना जवळच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. घरे कोसळण्यापूर्वी सर्व नागरिकांना हलवण्यात आले होते. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.  

विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात मेट्रोचे (Metro) काम सुरू आहे. त्यामुळे आजुबाजूच्या घरांना तडे गेले आहेत. यातील आठ ते दहा घर कोसळली आहेत. तर 40  घरांना तडे गेले आहेत. यातील काही घरे नाल्यालगतची कोसळू शकतात, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलेले असून बीएमसी (BMC) या प्रकरणाचा तपास करत आहे. 

विलेपार्ले पश्चिमेकडे जुहू रोड परिसरात मिठीबाई महाविद्यालयाच्याजवळ 30 ते40 दुमजली झोपड्या आहेत. याच झोपड्यांजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामाच्या हदऱ्यांमुळेच झोपड्या कोसळ्यात आहेत असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Winter Session 2026: 'बर्च फायर'चा तपास CBI कडे सोपवा! "सरपंच, सचिवावर कारवाई, मग संबंधित मंत्र्यांना अभय का?" युरींनी सरकारला धरलं धारेवर

Goa Carnival 2026: उत्सुकता संपली! गोवा कार्निव्हलच्या तारखा जाहीर; संपूर्ण शेड्युल जाणून घ्या एका क्लिकमध्ये..

Goa Winter Session 2026: कॅश फॉर जॉब प्रकरणाचा सरकारशी संबंध जोडू नका, मुख्यमंत्री

Ranji Trophy: गोव्याची बाकी रणजी मोहीम खडतरच, महाराष्ट्राविरुद्ध पुण्यात; तर केरळविरुद्ध पर्वरीत रंगणार लढत

'गोमन्तक-सकाळ'तर्फे रविवारी चित्रकला स्पर्धा, प्रवेश विनामूल्य; स्पर्धेच्या दिवशी थेट केंद्रावरही सहभागी होता येणार

SCROLL FOR NEXT