Nivrutti Maharaj Deshmukh Indurikar Dainik Gomantak
महाराष्ट्र

Indurikar Maharaj: कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई राजकारणात, 'या' पक्षात केला प्रवेश

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी निळवंडे गावची सत्ता त्यांच्याकडे असल्याचे सांगितले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Indurikar Maharaj: कीर्तनाच्या आपल्या वैविध्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध असलेले इंदोरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. महाराज यावेळी त्यांच्या सासूबाई यांच्या राजकीय प्रवेशामुळे चर्चेत आहेत. संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच असलेल्या शशिकला पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी निळवंडे गावची सत्ता त्यांच्याकडे असल्याचे सांगितले होते.

शशिकला पवार निळवंडे गावातून अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर 227 मतांनी विजय मिळवला आहे. गावच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याचे शशिकला पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या थोरातांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपात प्रवेश करत असल्याचे शशिकला पवार यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे निळवंडे गाव बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील आहे. अशात शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केल्याने थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पवार यांनी गावच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध असून, दोन्ही नेत्यांनी या अगोदर देखील सहकार्य केले आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: अमेरिकेचे थंडरबर्ड्स लढाऊ जेट कॅलिफोर्नियात कोसळले; प्रशिक्षणादरम्यान भीषण अपघात, पायलट थोडक्यात बचावला!

AUS vs ENG: मिचेल स्टार्कचा ऐतिहासिक रेकॉर्ड! वसीम अक्रमला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये ठरला जगातील नंबर-1 डावखुरा वेगवान गोलंदाज VIDEO

IndiGo Flight Bomb Threat: मदीनाहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Indigo Issue: इंडिगोवर 'महा'संकट! 250 हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांचे हाल; नेमके कारण काय?

Pooja Naik: पूजा नाईकची नार्को चाचणी करावी, त्यातून बरीच नावे समोर येतील - काशिनाथ शेट्ये

SCROLL FOR NEXT