Sambhaji Raje Chhatrapati  Dainik Gomantak
महाराष्ट्र

मराठा बांधवांना पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये

आंदोलनस्थळी महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये.

दैनिक गोमन्तक

छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला आहे. यावेळी त्यांनी चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी स्पष्ट केले. तसेच, यासंदर्भात एक महत्वाचे ट्विट केले. त्यात त्यांनी राज्यशासन आणि प्रशासनाला विनंती केली आहे.

ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, मराठा (Maratha Reservation) समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी 26 फेब्रुवारीपासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणाला जरी मी एकट्याने उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असला तरी, आंदोलनस्थळी महाराष्ट्रातून येणाऱ्या (Maharashtra) येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती!, असे आवाहन त्यांनी ट्विटच्या माध्यामातून राज्यशासनाला केले आहे.

दरम्यान, मराठी आरक्षणविषयी राज्यसरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईत बोलतांना ही घोषणा केली होती. 2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र (Maharashtra) पिंजून काढला आहे. मराठा समाजही हा वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो असल्याचे वक्तव्यही खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केलं होतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT