Viral Video of Leopard Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral Video: आजारी बिबट्यासोबत लोक व्हिडिओ, फोटो काढण्यात व्यस्त; बिबट्याचा मृत्यू

आजारी असलेला बिबट्या पूर्णपणे थकलेला आणि धापा टाकत होता.

गोमन्तक डिजिटल टीम

आजारी असलेला बिबट्या धापा टाकत होता मात्र, लोकं आजारी बिबट्यासोबत फोटो आणि त्याचा व्हिडिओ (Photo and Video with Sick Leopard) काढण्यात व्यस्त आहेत. असा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आजारी बिबट्या पुढील 24 तासांत मरण पावला. अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यातील (Srigonda, Ahmednagar) रायगव्हाण गावातील हा व्हिडिओ आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओ नंतर लोकांकडून बिबट्याच्या मृत्यूबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथे गुरूवारी (दि.22) एका शेतात पूर्ण वाढ झालेला बिबट्या आढळून आला. मोकळ्या शेतात दिसून आलेल्या या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. आजारी असलेला बिबट्या पूर्णपणे थकलेला आणि धापा टाकत होता. त्याला जास्त वेळ डोळेही उघडे ठेवता येत नव्हते. असे असताना जमा झालेली गर्दी बिबट्यासोबत फोटो काढण्यात, त्याचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. तसेच, काहीजण बिबट्याला स्पर्श करताना देखील दिसत आहेत.

बिबट्या आजारी असल्याचे काही सजग नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडून, त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री या बिबट्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल असताना बिबट्याला न्यूमोनिया झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, यावरून नेटकरी चांगलाच संताप व्यक्त करत आहेत. कोण माणूस कोण प्राणी असा प्रश्न पडत आहे. अशी एका नेटकऱ्याने कमेन्ट केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT