Video: अंजनारी पुलावरुन LPG गँस टॅकर नदीत कोसळला; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली

मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत झाली आहे.
Lpg Gas tankar
Lpg Gas tankarDainik Gomantak

रत्नागिरीतील लांजा येथील अंजनारी पुलावरुन जाणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टॅंकर नदीत कोसळला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) वाहतूक 15 तासांपासून विस्कळीत झाली आहे. या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला आहे. टँकर एलपीजी वायूने भरलेला आहे. त्यामुळे धोका कायम आहे. परिणामी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक सुरळीत करायची तर त्यासाठी टँकरमध्ये असलेला एलपीजी वायू सुरक्षीतपणे बाहेर काढावा लागणार आहे. त्यानंतर वाहतूक सुरळीत होणार आहे. अद्याप हे काम सुरु न झाल्याने या महामार्गावरुन वाहतूक करणाऱ्या प्रवासी आणि कोकणवासीयांना अडचणींचा सामना कराव लागत आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीचा (LPG) टँकर गुरुवारी दुपारी अडीच वाजणेच्या सुमारास अंजनारी पुलावरुन जात होता. दरम्यान, अपघात होऊन तो नदीत कोसळला. टँकरमध्ये असलेल्या एलपीजी वायूबद्दल अनेक जण वेगवेगळी माहिती, तर्कवितर्क आणि शक्यता व्यक्त करत आहे.

काहींच्या मते टँकर वायूने पूर्ण भरला आहे. तर काहीच्या मते टँकरमध्ये केवळ 20 ते 25 किलो इतकाच एलपीजी गॅस आहे. त्यामुळे नेमकी कोणालाच अधिकृत माहिती नाही. त्यातच टँकरमधून वायूगळती होत असल्याने धोका आणखीच वाढला आहे. दरम्यन, टँकरमधील वायू गळती रोखण्यासाठी तज्ज्ञांची एक टीम लवकरच गोवा (Goa) आणि उरण येथून घटनास्थळी दाखळ होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Lpg Gas tankar
Maharashtra: ठाण्यात AIMIM कार्यालयाची तोडफोड, अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीला केली मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडलेला टँकर जयगड येथून गोव्याच्या दिशेने गुरुवारी निघाला होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा टँकर अंजनारी पुलावरील उतारावरुन जात असताना चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर नदीत कोसळला. टँकर पाण्यात कोसळल्याने चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

प्रमोद जाधव असे चालकाचे नाव आहे. ते मुळचे उस्मानाबादचे आहेत. दरम्यान, अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाचे पथक आणि ‘फिनोलेक्स’, ‘जिंदाल’ कंपन्यांची सुरक्षा पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अतिशय उंचावरुन नदीत कोसळल्याने टँकरचे केबीन, टाकी आणि बॉडी असे तिन वेगवेगळे भाग झाले आहेत.

दरम्यान, वाहतूक विस्कळीत झाली असली तरी ती पूर्ण ठप्प होऊ नये यासाठी ती पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मुंबई च्या दिशेने जाणारी वाहने शिपोली, पाली, दाभोळे मार्गे वळवण्यात आली आहेत. तर मुंबईकडून (Mumbai) रत्नागिरीच्या दिशेने येणारी वाहने देवधे, पुनस, काजरघाटीमार्गे प्रवेश करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com