parambir singh 1.jpg 
महाराष्ट्र

सीबीआय चौकशीसाठी परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात याचिका

दैनिक गोमंतक

दिल्ली: (Parambir Singh appeared in the Supreme Court for a CBI inquiry) मुंबईतील मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रोज नवनवीन हालचाली घडताना दिसत आहेत. त्यातच आता हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. कारण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून, याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.  या याचिकेत सीबीआयने तातडीने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची योग्य चौकशी करावी अशी मागणी केली आहे. (Parambir Singh appeared in the Supreme Court for a CBI inquiry)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना 100 कोटी वसूल करण्याचे टार्गेट देण्यात आल्याचा आरोप करत एक पत्र लिहिले होते. या पत्रानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा मुद्दा आज लोकसभा आणि राज्यसभेत  देखील   उपस्थित झाला. संसदेत भाजपचे मनोज कोटक यांनी 100 कोटींचा मुद्दा उपस्थित केला. त्याचवेळी पक्षाचे खासदार राकेश सिंह सभागृहात म्हणाले की, ''महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे आणि ते गृहमंत्र्यांना वाचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे या प्रकरणाची  केंद्रीय केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे वस्तुनिष्ठपणे चौकशी केली पाहिजे.''

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली चारचाकी वाहनातील स्फोटके आणि त्यानंतर वाहनाचा  संभाव्य  मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपस सुरू आहे. या प्रकरणात 'अक्षम्य चुका' केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागात बदली झाली. यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT