Dead Rat Found In Chicken Curry In Mumbai Restaurant. Dainik Gomantak
महाराष्ट्र

Rat In Chicken Curry: ऑर्डर चिकन करीची अन् ताटात मेलेला उंदीर! मुंबईतील हॉटेलमधील किळसवाना प्रकार

Rat In Chicken Curry: ग्राहकाने ऑर्डर केलेले जेवण खायला सुरुवात केली. जेव्हा त्याने मांसाचा तुकडा तोंडात टाकला तेव्हा त्याला ते कोंबडीचे मांस नसल्याचा संशय आला.

Ashutosh Masgaunde

Dead Rat Found In Chicken Curry In Mumbai Restaurant: मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये चिकन करी ऑर्डर करणाऱ्या एका व्यक्तीसोबत अत्यंत किळसवाना प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या व्यक्तीने हॉटेलमध्ये जेवणासाठी चिकन करीची ऑर्डर दिली होती. मात्र त्याच्या ताटातील दोनच घास खाल्यानंतर चिकन करीमध्ये त्याला मेलेला उंदीर सापडला.

या प्रकारानंतर त्या व्यक्तीने हॉटेल व्यवस्थापकाला याचा जाब विचारला मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर रेस्टॉरंटच्या मॅनेजर आणि शेफवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबत घडली आहे.

अनुराग सिंग आणि त्याचा मित्र अमीन रविवारी रात्री मुंबईतील वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पंजाबी जेवण खाण्यासाठी गेले होते.

पापा पांचो दा (Papa Pancho Da Dhaba) असे या हॉटेल नाव आहे. त्याने इथे दोन डिश ऑर्डर केल्या. यापैकी एक मटन करी आणि एक चिकन करी होती. त्यावेळी चिकन करीमध्ये मेलेला उंदीर सापडला.

जेव्हा या ग्राहकाने ऑर्डर केलेले जेवण आल्यानंतर ते खायला सुरुवात केली. जेव्हा त्याने मांसाचा तुकडा तोंडात टाकला तेव्हा त्याला संशय आला की ते कोंबडीचे मांस नाही.

हा मांसाचा तुकडा नीट पाहिल्यानंतर तो मेलेला उंदीर असल्याचे त्याला समजले. यानंतर अनुराग आणि त्याच्या मित्राने हॉटेल मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली.

यावर हॉटेल व्यवस्थापकाने त्याला अस्पष्ट उत्तरे दिल्याचे अनुरागने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जावे लागल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.

बांद्रा पोलिसांनी (Bandra Police Station) हॉटेलचा शेफ, मॅनेजर आणि चिकन सप्लायरवर गुन्हा दाखल केला आहे.

या तिघांविरुद्ध अन्नपदार्थात भेसळ करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT