Padma Awards 2022
Padma Awards 2022 Dainik Gomantak
महाराष्ट्र

Padma Awards 2022: जाणून घ्या महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेत्यांची नावं

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारने पद्म पुरस्कार (Padma Awards 2022) विजेत्यांची घोषणा केली आहे. प्रजासत्ताक (Republic Day) दिनाच्या पूर्वसंध्येला या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्काराचे तीन भाग आहेत - पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. यावेळी 13 पुरस्कारांसह उत्तर प्रदेश सर्वाधिक पारितोषिक मिळवणारे राज्य ठरले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राने (Maharashtra) 10 पुरस्कारांसह दुसरे स्थान पटकावले आहे. यावेळी चार सेलिब्रिटींना पद्मविभूषण देण्यात आला आहे. 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, देशाने पहिले सीडीएस बिपिन रावत गमावले. हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सरकारकडून त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सरकारने लस उत्पादकांचाही सन्मान केला आहे. पद्म पुरस्कारांमध्येही निवडणुकीचीही जोड दिसून येत आहे. यावेळी यूपीमधील 13, उत्तराखंडमधील 4, पंजाबमधील 4, गोव्यातील 2 आणि मणिपूरमधील 3 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वेळी अनेक खेळाडूंना सन्मानित करून त्यांना देशासाठी खेळण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. एकूण 9 खेळाडूंना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील पद्मपुरस्कार विजेते

प्रभा अत्रे पद्मविभूषण कला

नटराजन चंद्रशेखरन पद्मभूषण व्यापार आणि उद्योग

सायरस पूनावाला पद्मभूषण व्यापार आणि उद्योग

हिम्मत राव बावस्कर पद्मश्री औषध

सुलोचना चव्हाण पद्मश्री कला

विजयकुमार विनायक डोंगरे पद्मश्री मेडिकल

सोनू निगम पद्मश्री कला

अनिलकुमार राजवंशी पद्मश्री विज्ञान आणि अभियांत्रिकी

भीमसेन सिंघल पद्मश्री मेडिकल

बालाजी तांबे (मरणोत्तर) पद्मश्री चिकित्सा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Jetty : खारीवाडा जेटीवर ट्रॉलर्स विसावले; साफसफाईची लगबग

Toll Tax Rate Hiked: प्रवास झाला महाग, लोकसभा निवडणुक संपताच टोल दरात एवढ्या टक्क्यांनी वाढ

Bicholim Road : डिचोली ‘आयडीसी’त रस्ता धुळीने माखला; कामगार त्रस्त

Panaji News : ग्राम पंचायतींच्या नव्या वास्तू दिव्यांगांसाठी त्रासदायक : आवेलिनो डिसा

Panaji News : शैक्षणिक साहित्यालाही महागाईची झळ; १५ टक्क्यांपर्यंत दरवाढीने पालकांचे बजेट कोलमडले

SCROLL FOR NEXT