Padma Awards: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील पहिले CDS जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जनरल रावत, त्यांची पत्नी आणि इतर वरिष्ठ आयएएफ अधिकाऱ्यांचा नुकताच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (The posthumous Padma Vibhushan award has been announced for General Bipin Rawat)
देशात कोरोनाची स्वदेशी लस विकसित करणाऱ्या हैदराबादस्थित भारत बायोटेकचे प्रमुख सायरस पुनावाला यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawala) आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.