अतिवृष्टीमुळे भात शेती (Rice farming) ही पाण्याखाली आली आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

रत्नागिरीतील भातशेती पाण्याखाली : शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट

अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील भात शेती (Rice farming) ही पाण्याखाली आली आहे

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात (Ratnagiri District) गेले चार दिवस सतत पाऊस (Rain) पडत आहे. यामुळे येथील भात शेतीला (Rice farming) मोठा फटका बसला आहे . याचे मुख्य कारण म्हणजे नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे नद्यानी आपले पात्र सोडून दिले आहे. यामुळे या नदी जवळच्या शेतांमध्ये याचे पाणी शिरले आहे. परिणामी येथील भात शेती पाण्याखाली गेले आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भात शेती ही पाण्याखाली आली आहे. तसेच पावसाचा जोर असाच कायम राहीला तर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. अशीच परिस्थिति राहिल्यास पाण्याचा निचरा होणार नाही. यामुळे येथील शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसू शकतो.

या जिल्ह्यात पुढील 18 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शवला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती . परंतु पुढील 18 तास रत्नागिरी जिल्हयातील नागरिकांसाठी चिंताजनक असणार आहे. कारण अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दर्शविला आहे. काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे येथील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे. येथील नद्यांच रौद्र रूप धरण केले आहे.

दरम्यान , या पावसामुळे सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल या नद्या भरुन गेल्या आहेत. त्यामुळे नदीकाठ राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला होता . या जिल्ह्यातील राजापूरला दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT