कोकणामध्ये (Kokan) गणेशत्सवासाठी (Ganeshatsava) जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कोकणात गणेशत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी पाहता यंदा एसटी महामंडळाच्या (ST Corporation) पुणे, मुंबई (Mumbai) ठाणे, पालघर विभागामधून 2 हजार 200 लालपरी बसेस कोकणात सोडण्यात येणार आहेत. 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून कोकणवासीयांना थेट घरापर्यंत सुखरुप सोडण्यात येणार आहे. तर 14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. 16 जुलै 2021 पासून या एसटी बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण देखील सुरु होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.
कोकणात दरवर्षी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सुविधेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने अधिक बस गाड्या सोडण्यात येतात. मात्र मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे राज्यात जिल्हा प्रवासावर रोख लावण्यात आला होता. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईमधून कोकणात गणेशत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मागील वर्षी 20 ऑगस्टला गणपती बप्पाचे आगमन झाले होते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या वेळखाऊ धोरणामुळे गणेशत्सव अवघ्या 15 दिवसांवर आल्यानंतर बस गाड्या चालवण्यात आल्या होत्या.
त्यामध्येही 12 ऑगस्टनंतर 48 तासापूर्वी कोरोना रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेल्या चाकरमान्यांनाच कोकणात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर दहा दिवसांचे विलगीकरणही त्यांच्यावर बंधनकारक होते. त्यामुळे कोकणामध्ये जाण्यासाठी चाकरमान्यांनी एसटी बसेसला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. मात्र मागील वर्षीप्रमाणे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता यावर्षी मात्र एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्यांसाठी गाड्या सोडण्याचे नियोजन दोन महिने आधीच केले आहे.
कोकणात जाण्यासाठी 4 सप्टेंबरपासून धावणार बसेस
यावर्षीच्या गणेशोत्सवावर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचं सावट आहे. मात्र मागील वर्षी यंदा कोरोनाची परिस्थीती नियंत्रणात आहे. यामुळे कोकणात जाण्यासाठी गणेशत्सवासाठी एसटी महामंडळाकडून 2 हजार 200 गाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा 10 सप्टेंबर रोजी गणपती बप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे या बस गाड्या 4 सप्टेंबर 2021 पासून धावणार आहेत. त्याचबरोबर या विशेष बस गाड्यांचे आरक्षण येत्या दोन ते तीन दिवसामध्येसुरु होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील वर्षीप्रमाणे प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकरिता यंदा मात्र महामंडळाने कोकणासाठी गाड्या सोडण्याचे नियोजन दोन महिने आगोदरच करण्यात आले आहे. त्यानुसार ठाणे, मुंबई, पालगर विभागामधून 2200 गाड्या कोकणामध्ये सोडण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाकडून पूर्ण तयारी-
कोरोनाच्या पाश्वभूमीवर प्रवासापूर्वी सर्व बसेस सॅनिटाइझ करण्यात येणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसटीची वाहतूक गणेशत्सवादरम्यान सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एसटी कर्मचारी अहोरात्र काम करणार आहेत. तसेच कोकणामधील महामार्गावर वाहनदुरुस्ती पथके देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी प्रसाधानगृही उभारण्यात येणार आहेत.
रेल्वेचे आरक्षण हाऊसफुल्ल-
कोकणात गणेशत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गेल्या महिन्यात मध्य रेल्वेने गणपती स्पेशल रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या गाड्यांचे आरक्षणसुध्दा सुरु करण्यात आले होते. मात्र काही दिवसामध्ये मध्य रेल्वेच्या 72 विशेष गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहेत. या गणपती स्पेशल रेल्वे सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी- रत्नागिरी, सावंतवाडी-पनवेल आणि रत्नागिरी- पनवेल या स्पेशल गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या 72 रेल्वे ट्रेन आरक्षण हाऊसफुल्ल झाल्यामुळे प्रवासी संघटनांनी आणखी गणपती स्पेशल रेल्वे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून आणखी गणपती स्पेशल रेल्वे चालवण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.