महाराष्ट्रात कोरोनाचं (Covid 19) वाढतं सावट असताना दुसरीकडे दहावीच्या निकालाची (SSC Result 2021) प्रतिक्षा करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मोठी बातमी आहे. शुक्रवारी दुपारी महगाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा होणार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली आहे.
दहावीच्या परिक्षेसाठी राज्यातील एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर परिक्षा रद्द झाल्यामुळे मूल्यांकन पध्दतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापेकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून विद्यार्थ्यांचे गुण कॉम्युटर सिस्टीमध्ये अपलोड करण्यात आले असल्याचे माहिती देण्यात येत आहे.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा परिक्षा न घेता सरधोपटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर य़ा विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या अंतर्गत गुण आणि त्यांच्या मूल्यामापनाच्या संदर्भात 10 जूनपासून शाळा स्तरावर कार्यवाहीला सुरुवातही झाली होती. 3 जुलैपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करुन राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर करण्यात येणार होता. मात्र आता एक दिवस उशिराने निकाल जाहीर होणार आहे.
यावर्षी कोरोनाच्या पाश्वभूमीवर लेखी परिक्षा न होता, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे महाराष्ट्रातील सुमारे 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या ‘http://result.mh-ssc.ac.in' या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपल्याला किती गुण मिळाले आहेत ते पाहता येणार आहे.
ज्या राज्य शिक्षण मंडळामार्फत 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान दहावीची लेखी परिक्षा घेण्यात होती. परंतु राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे ही परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंबंधीचा अधिकृत आदेश 12 मे रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले आणि तसा आधिकृत आदेश महाराष्ट्र सरकारने काढला. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते कम्प्युटर प्रणालीमध्ये नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना 23 जूनपासून ते 9 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. विद्यार्थ्यांचे गुण शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विभागीय मंडळांकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करुन विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव हा राज्य मंडळाकडे पाठविण्यात आला. त्यानंतर राज्य स्तरावर 15 जुलैपर्यंत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.