Paddy cultivation in full swing in Raigad district 
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात भात शेती लावणीला जोमात सुरवात

दैनिक गोमंतक

रायगड - महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात (Raigad district) अनेक दिवसापासून पाऊस (Rain)  समाधानकारक पडतो आहे. त्यामुळे शेतीकरिता पोषक असे वातावरण तयार झाले आहे. असे वातावरण भातशेतीसाठी उत्तम आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी (Farmers) भातशेती करण्यास सुरुवात केली आहे. (Paddy cultivation in full swing in Raigad district)

रायगड जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाल्याने भाताच्या रोपांची योग्य अशी वाढ झाली आहे. शेतात भाताची रोप लावण्यायोग्य चिखल देखील तयार झाला आहे.  यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी लावणीच्या कामाला जोमाने लागले आहे. भाताचे कोठार म्हणुन रायगड जिल्ह्या ओळखला जातो.

या जिल्ह्यात एक लाख दहा हजार हेक्टरच्यावर भात शेती केली जाते. आता पर्यंत जिल्ह्यात ८१८ मी. मी एवढी पावसाची नोंद झालेली आहे. येथे शेतीला पोषक असा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आज पासून भात रोपे लावण्याच्या कामाला गुंतला आहे. येथील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील  सर्व सदस्य खणणनी, नांगरणी, भात पिक लावणीच्या कामात चांगलेच गुंतलेले आहेत .  

दरम्यान, महाड पोलादपूर , श्रीवर्धन म्हसळा ते अगदी रोहा अलिबाग पेण तालुक्यात पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी (River), नाल्याच्या  पाणी पातळीत वाढ झाली आहे. अद्याप कोणताही धोका नाही कारण पाण्याची पातळी प्रमाणात  वाढली आहे. परंतु, डोलवहाळ बंधाऱ्याने पाण्याची पातळी ओलांडली आहे. हा पाऊस शेतीसाठी पूरक असल्याने पिकांची चांगलीच वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी समाधानी झाले आहेत. 

तसंच गोव्यात पावसाने उसंत घेतली असून पुढील पाच दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार आहे. तुरळक सरी वगळता मोठा पाऊस होणार नाही, असा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तविला आहे. सोमवारी तापमानात थोडी वाढ झाली. 

पाऊस उघडल्यामुळे शेतकामांना अनुकूल वातावरण असल्याने शेतकरी उत्साही आहेत. सकाळच्या सत्रात काही काळ पाऊस झाला. पेडणे, वाळपई आणि सत्तरी परिसरात मात्र दिवसभर तुरळक रिपरीप सुरू होती. पुढील दोन दिवसात वादळी वारेही ओसरल्यामुळे समुद्रातील वातावरण शांत राहणार आहे, अशी माहिती वेधशाळचे एम. राहुल यांनी दिली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT