Old Age Pension Scheme Dainik Gomantak
महाराष्ट्र

Old Age Pension Scheme: महाराष्ट्र सरकारची 'ही' योजना वृद्धांना बनवेल स्वावलंबी

वृद्धांसाठी देशभरात सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत.

दैनिक गोमन्तक

वृद्धांसाठी देशभरात सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील वृद्धांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारने वृद्धापकाळ पेन्शन योजना सुरू केली. मात्र, या योजनेच्या लाभासाठी सरकारने काही अटीही घातलेल्या आहेत. ते पूर्ण करून, तुम्ही या योजनेचा अगदी सहजरित्या लाभ घेऊ शकता. (Old Age Pension Scheme)

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभ

या योजनेअंतर्गत सरकार वृद्धांना दरमहा 600 रुपये देणार आहे.

त्याचबरोबर वृद्ध नागरिकांनाही या योजनेतून आधार मिळणार आहे.

वृद्ध आणि निराधार लोकांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे.

ज्यांना कोणताही आधार नाही अशा लोकांना या योजनेत सामावून घेतले जाणार आहे.

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची पात्रता

या योजनेसाठी व्यक्तीचे वय किमान 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

अर्जदार हा मूळचा महाराष्ट्रातील असावा.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी हवे.

अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

जात प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

बँक पासबुकचा फोटो

पासपोर्ट आकाराचा फोटो

ओळखपत्र

जन्म प्रमाणपत्र

बीपीएल रेशन कार्ड

महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्ती वेतनासाठी नोंदणी कशी करावी

या योजनेच्या नोंदणीसाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

त्यानंतर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी थेट खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला दोन पर्यायांपैकी एकावर क्लिक करा.

मग तुमच्या समोर फॉर्म उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा जिल्हा, मोबाईल नंबर टाकायचा आहे.

त्यानंतर तुमच्या नंबरवर एक OTP येईल जो तुम्हाला फॉर्ममध्ये भरावा लागेल.

अशा प्रकारे नोंदणी केल्यानंतर, तुम्ही महाराष्ट्र वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT