लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांचा मोठा निर्णय, प्रफुल्ल पटेल यांचे ट्विट व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे सर्व विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त करण्यास सांगितले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Dainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे सर्व विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त करण्यास सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने बुधवारी याबाबय माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल (Paraful Patel) यांनी देखील ट्विट केले आणि म्हटले की, "राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने, सर्व विभाग आणि कक्ष तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत आहेत". (Sharad Pawar big decision before Lok Sabha elections Praful Patel tweet goes viral)

Sharad Pawar
Maharashtra: स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC आरक्षणाला परवानगी

मात्र, माजी केंद्रीय मंत्री असलेल्या पटेल यांनी या अचानक कारवाईचे कारण अध्याप सांगितलेले नाही. प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार पडल्यानंतर सुमारे तीन आठवड्यांनंतर असा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीपूर्वी जुन्या पदाधिकाऱ्यांची बदली होणार असल्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे.

पक्ष मजबूत करण्यावर शरद पवारांचा भर

गेल्या महिन्यात सत्ता गमावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत स्वत:ला मजबूत करण्यावर भर दिला. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 263 सदस्यीय बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महानगरातील पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले आहे. खुद्द शरद पवारही मुंबईवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com