Devendra Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

काहीही झालं तरी मी घोटाळे बाहेर काढणारचं: देवेंद्र फडणवीस

राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे.

दैनिक गोमन्तक

बदली घोटाळा अहवाल लीक प्रकरणी फडणवीसांचा पोलिसांनी जवाब नोंदवला गेला आहे. गेले दोन तास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कसून चौकशी चालु होती. आता या चौकशी नंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर आले आहेत. भाजपच्या सर्व नेत्यांची सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. (No matter what happens I will bring out the scams Devendra Fadnavis)

राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला. याची माहिती मी केंद्रीय गृहविभागाला दिली, गृहविभागाने ती चौकशी सीबीआयला दिली. राज्यात बदल्यांचा जो महाघोटाळा झाला त्याची माहिती मी केंद्रीय गृह सचिवांपर्यत पोहोचवली आहे. ही माहिती सीबीआयने दिली, हा महाघोटाळा घडला म्हणून सीबीआय याची चौकशी करत आहे मी जर हा विषय बाहेर काढला नसता तर हा विषय दबून गेला असता.

बदल्यांचा महाघोटाळा ठाकरे सरकाराने ( Thackeray government) सहा महिने दाबून ठेवला आहे. पोलिसांनी मला प्रश्नावली पाठवली आणि हजर राहण्यास सांगतले होते त्यावरती मी पत्र देखील पाठले होते. काल त्यांनी मला हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. सभागृहात जे विषय मी मांडत होतो त्यामुळे अचानक अशी नोटीस मला दिली गेली. सभागृहात मी जे मुद्दे मांडतोय दाऊदशी संबध दाखवतोय यामुळेच मला नोटीस आली, त्यानुसारच सागर बंगल्यावरती अधिकारी आले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला विशेष अधिकार आहेत, मला सोर्स कुठुन आहेत हे तुम्ही मला विचारु शकत नाही. गोपनिय माहितीचे उल्लघंनकेल्याचा रोख माझावर होत आहे. मला आरोपी बनवता येईल का असे प्रश्न विचारले जात होते.

मी काल म्हणालो मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास येतो पण त्यांनी मला सांगितले नाही की आम्ही येतो म्हणुन. आजच्या सर्व प्रश्नांचा रोख ऑफिशियल ऍक्टचा उल्लंघन मी केले असा रोख होता मला आरोपी आणि सह आरोपी मला करता येईल का असे प्रश्न मला विचारण्यात आले आहेत. हा घोटाळा मी बाहेर काढला आहे. तो न्यायालयाने मान्य केला आहे

मी जबाबदार नेत्यासारखा वागलो, पेनड्राइव्ह मी कोणाला ही देणार नाही कारण ते सेनसेटिव्ह आहे. राज्य सरकारने जो घोटाळा दाबला आहे त्यामुळे मी त्यांना पेनड्राइव्ह दिला नाही, या यादीत अनेक आयपीएस अधिकारांची नावे आहेत, जी त्यात आहेत.

पेन ड्राइव्ह (pen drive) मी कुणालाही देणार नाही असे मी त्यावेळी सांगितले राज्य सरकारने जो घोटाळा दाबला त्याची कागदपत्रे मी दिली असती तर यांनी काय दिवे लावले असते कव्हरिंग लेटर व्यतिरिक्त मी कोणतीही कागदपत्रे समोर आणलेली नाहीत, सर्व कागदपत्रे नवाब मलिक यांनी दिली. कितीही गोवण्याचा प्रयत्न केला तरी मला गोवण्यात येणार नाही मी थांबणार नाही मी घोटाळे बाहेर काढणारच. माझी चौकशी करण्याचा उपक्रम जो काही सरकारने राबवला आहे त्यातून काहीही हाथी लागणार नाही सरकारला यातून काही हाती लागणार नाही त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत हे सरकारने लक्षात घ्यायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT