महाराष्ट्रातील जनतेला होळीची भेट! सरकारने CNG च्या दरात केली कपात

नवीन दर लागू केल्याने, CNG ग्राहकांना 5.75 रुपये प्रति किलोचा फायदा
CNG and PNG price
CNG and PNG price Dainik Gomantak

CNG Price: महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) होळीनिमित्त शहरवासीयांना भेट दिली आहे. सरकारने सीएनजीच्या दरात कपात केली आहे. शुक्रवारी सीएनजीवरील (CNG) व्हॅट शुल्क 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच सीएनजीचा नवा दर 66 रुपये प्रति किलो आहे. नवीन दर लागू केल्याने, ग्राहकांना 5.75 रुपये प्रति किलोचा फायदा मिळेल.

CNG and PNG price
राणे बंधुंच्या मागे कारवाईचा ससेमिरा; पवारांवरील टीकेनंतर गुन्हा दाखल

सीएनजीचे दर कमी झाले

गेल्या 7 महिन्यांत महाराष्ट्र सरकारने सीएनजीच्या दरात सुमारे 20 रुपयांची वाढ केली आहे. महानगर गॅस लिमिटेडने जुलै 2021 मध्ये CNG च्या किमतीत 2.58 रुपये प्रति किलोने वाढ केली होती. जुलैमध्ये सीएनजीची किंमत 50 रुपये किलोपेक्षा कमी होती. पण, त्यानंतर सीएनजीच्या दरात वाढ होत राहिली. ऑक्टोबरमध्ये सीएनजीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर सीएनजीची किंमत 54.57 रुपये प्रति किलो झाली. यानंतर नोव्हेंबरमध्ये सीएनजीच्या दरात 3.06 रुपयांची वाढ झाली. यानंतर 17 डिसेंबरला पुन्हा एकदा मुंबईत सीएनजीचा दर 63.50 रुपये प्रति किलोवर पोहोचला. मात्र, आता सीएनजीच्या दरात कपात झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

CNG and PNG price
सहज हस्तांतरित करा 'सुकन्या समृद्धी' खाते एका बँकेतून दुसर्‍या बँकेत

CNG-PNG ची किंमत किती आहे

महानगर गॅस लिमिटेडने गॅसच्या किमतीत वाढ करण्यासाठी सीएनजीची किंमत 63.40 रुपयांवरून 66 रुपये प्रति किलो, तर पीएनजीची किंमत 38 रुपये प्रति एससीएमवरून 39.50 रुपये प्रति किलोग्रॅम करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com