Sushant Singh Rajput & Disha Salian Dainik Gomantak
महाराष्ट्र

Disha Salian Death Case: 'आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा...,' नितेश राणेंची मागणी

Disha Salian Death Case: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Disha Salian Death Case: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर असलेल्या दिशा सालियन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिशा सालियन प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यानंतर एका आठवड्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेहही पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गुरुवारी पुन्हा दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. दिशा सालियनची हत्या झाल्याचा दावा नितेश राणे करत आहेत. विशेष म्हणजे, अनेकवेळा त्यांनी आपल्या दाव्याला पुरावे असल्याचा दावा केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, 'दिशा सालियनचा प्रियकर रोहन राय याला 'हत्ये'बद्दल सर्व काही माहित होते आणि तो तिच्या मृत्यूनंतर गायब झाला.' दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. मात्र ती इमारतीवरुन कशी पडली हे अद्याप समजू शकलेले नाही. एका आठवड्यानंतर सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृतावस्थेत आढळला.'

सीसीटीव्ही फुटेज गायब, नितेश राणे म्हणाले

आता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष असेल.” भाजप आणि शिवसेनेचे अनेक नेते (शिंदे गट) – भरत गोगावले, नितेश राणे, भारती लवेकर, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी दिशा प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

यापूर्वी, नितेश राणे म्हणाले होते की, "सीसीटीव्ही फुटेज गायब आहे आणि शवविच्छेदन अहवालही समोर आलेला नाही." त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, 'आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार दिशा सालियन यांचा मृत्यू अपघाती असल्याचे घोषित करण्यात आला आहे.' दिशाचे नाव ज्या प्रकारे घेतले जाते, तिचे वडीलही दुःखी असल्याचे त्यांनी सांगितले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT