Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

ईडीची मोठी कारवाई, नवाब मलिकांना अखेर अटक

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसापासून गाजत असतानाच नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आजच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिक (Nawab Malik) यांची आज अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी सकाळी 6 वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. जिथे त्यांची सुमारे एक तास चौकशी करण्यात आली. घरी चौकशी केल्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून त्यांची ईडी कार्यालयातही चौकशी करण्यात आली.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना कथित अंडरवर्ल्ड संबंध असलेल्या मालमत्तेप्रकरणी समन्स बजावले होते. आता या प्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. ED ने 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत छापे टाकले होते. त्यामधून अंडरवर्ल्ड असलेला संबंध, कथित बेकायदेशीर खरेदी आणि मालमत्तांची विक्री, हवाला व्यवहारांसंदर्भात त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली.

तसेच, 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) दिवंगत बहीण, सलीम कुरेशी उर्फ ​सलीम फ्रूट, भाऊ इक्बाल कासकर आणि छोटा शकीलच्या नातेवाईकासह 10 ठिकाणी तपास यंत्रणेने छापे टाकले होते. आधीच कारागृहात असलेल्या कासकरला गेल्या आठवड्यात एजन्सीने अटक केली होती. पारकरच्या मुलाचीही ईडीने चौकशी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT