Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

covid 19 lockdown: नवाब मलिकांचा लॉकडाउनवरून मोदींना टोला

भाजप सरकार हे पाच वर्षांचे अहंकारी सरकार

दैनिक गोमन्तक

मुंबई: काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केली. आणि दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रात यासंदर्भात टोलेबाजी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Pratty)प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले की,'एक चांगले झाले की यावेळी लॉकडाउनची घोषणा केली नाही. मागच्या वेळी लोकांना विश्वासात न घेता आणि कोणताही विचार न करता लॉकडाउन लागू केला होता.'

तसेच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh)होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे अनेक नेते राजीनामा देऊन अन्य पक्षांत प्रवेश करत आहेत. आतापर्यंत 10 पेक्षा जास्त नेत्यांनी राजीनामा दिला. यासंदर्भात नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशातील भाजप (Bharatiya Janata Party) सरकार हे पाच वर्षांचे अहंकारी सरकार आहे. हे एक कारण यामागे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून करोना परिस्थितीचा आढावा घेतला. याबाबत बोलताना मलिक म्हणाले की, यावेळी करोना रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, लोक खबरदारी घेत आहेत. त्यामुळे हे एक बरे झाले की लॉकडाउनची घोषणा केली नाही. लॉकडाउन (Lockdown)लागू शकतो, अशी लोकांना भीती वाटत होती. मात्र, ही एक चांगली गोष्ट केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी (Chief Minister) चर्चा करताना, स्थानिक पातळीवर सद्यस्थितीची माहीती घेऊन राज्यांना यासंबंधी निर्णय घेण्यास सांगितले. मागील वेळी कोणताही विचार न करता आणि लोकांना विश्वासात न घेता लॉकडाउनची घोषणा केली होती, असा टोलाही मलिक यांनी पंतप्रधानांना लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT