Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

माझा अंडरवर्ल्डशी कोणताही संबंध नाही: नवाब मलिक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच मुंबईच्या गुन्हेगारांकडून नवाब मलिक यांनी बेनामी जमीन खरेदी केली असल्याचा देखील यावेळी त्यांनी आरोप केला होता.

दरम्यान, यावर उत्तर देताना मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांचेच अंडरवर्ल्डशी कशाप्रकारे संबंध आहेत याचा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर देवेंद्र यांनी पूर्ण पुराव्यनीशी बोलावे असंही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मी उद्याच फडणवीस यांचं सत्य समोर आणणार आहे. तुम्हाला जे कोणी माहिती देत आहेत ते कच्चे खेळाडू असल्याचे देखील यावेळी मलिक यांनी म्हटले आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप यापूर्वी माझ्यावर कोणीही केलेले नाहीत. मी कोणत्याही प्रकारची बेनामी संपत्ती खरेदी केलेली नाही. आम्ही जी संपत्ती खरेदी केली ती पूर्ण कायदेशीरपणे पध्दतीनेच केलेली आहे. देवेंद्र फडणवीस पोकळ आरोप करत मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करत फक्त राईचा पर्वत केला असल्याचे देखील म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT