अंडरवर्ल्ड माफियासोबत मलिकांचे संबंध; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

कुर्ल्यातील कोट्यवधींची जमीन केवळ 30 लाखांमध्ये कशी घेतली?
devendra fadnavis
devendra fadnavis Dainik Gomantak
Published on
Updated on

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी सांगितले होते की, काही गोष्टी दिवाळीनंतर मी सर्वांसमोर आणणार आहे. पण यासाठी थोडा उशीर झाला. तसेच काही कागद ही गोळा होत होते. त्यातच काही लोकांच्या पत्रकार परिषदा बुकिंग होत्या. यासाठी मला थोडा वेळ लागला. आज मी जे समोर जाणार आहे, तो अत्यंत गंभीर आणि राष्ट्राच्या सुरक्षतेशी निगडीत प्रश्न आहे.

दिवाळी नंतर गौप्यस्फोट करताना नवाब मलिकांवर फडणवीसांनी निशाणा साधला.

दाऊदच्या निकटवर्तीयांनी मलिकांना कंपनीसाठी जमीन विकली, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या वर निशाणा साधत कुर्ल्यातील कोट्यवधींची जमीन केवळ 30 लाखांमध्ये कशी घेतली? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.

devendra fadnavis
महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार ? देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी दोन पात्रांबाबत माहिती उद्घट करणार आहे. त्यापैकी एक सरदार शहाब अली खान हे 1993 मधील बॉम्ब ब्लास्टमधील गुन्हेगार आहे. यांना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे आणि सध्या ते तुरुंगातच आहेत. तरीही यांच्यावर आरोप होता की, टायगर मेमनच्या नेतृत्त्वात हे फायर ट्रेनिंगमध्ये सहभागी झाले होते. बॉम्बे स्टॉक एक्चेंज आणि मुंबई महापालिकेत या दोन्ही भागात बॉम्ब कुठे ठेवायचा? याबाबत तयारी केली होती. तसेच टायगर मेमन यांच्या घरी बॉम्ब स्फोट घडवून आणले. तसेच सर्व बैठकांना हे उपस्थित देखील होते. तसेच टायगर मेमनच्या गाड्यांमध्ये आरडीएक्स भरले. त्यामध्येही यांचा सहभाग होता.

तसेच, यातील दुसरे आहे ते, मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे. ज्यावेळी आर. आर. पाटील एका इफ्तार पार्टीसाठी गेलेले तेथे दाऊदच्या माणसासोबत त्यांनी फोटो काढला होता. आणि तो माणूस म्हणजे, सलीम पटेल. हा आहे. परंतु आर. आर. पाटलांचा यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. फोटोमुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले होते. असेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच त्यांनी पुढे सांगितले की, मोहम्मद सलीम पटेल हा दाऊदचा माणूस आहे आणि दाऊची बहिण हसीना पारकरचे ते चालक होते.

devendra fadnavis
नवाब मलिक, संजय राऊत यांना पगारावर ठेवले; नितेश राणेंची जहरी टीका

पुढे बोलताना ते म्हणाले, कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडजवळ 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडजवळील जागा महागडी होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटुंबियांना कंपनीसाठी ती जमीन विकली आहे. या जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांची सही आहे. आतापर्यंत ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांचीच असून काही दिवस स्वतः नवाब मलिकही या कंपनीचे डायरेक्टर म्हणून काम पहिले. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस या कंपनीला ही जागा फक्त 30 लाख रुपयांना विकली. तसेच त्या

कुर्ल्यातील गोवावाला काँप्लेक्समधील तीन एकर जमीन 30 लाखांना विकण्यात आली. परंतु याचं पेमेंट त्यांनी 20 लाखांच केलंय. आजही त्या जागेत एक मोठा शेड सॉलिडस कंपनीला भाड्याने दिला आहे.

devendra fadnavis
समीर वानखेडे -भाजप नेत्यांमध्ये भेट? नवाब मलिक करणार खुलासा

पुढे बोलताना ते म्हणाले, कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडजवळ 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडजवळील जागा महागडी होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटुंबियांना कंपनीसाठी ती जमीन विकली आहे. या जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांची सही आहे. आतापर्यंत ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांचीच असून काही दिवस स्वतः नवाब मलिकही या कंपनीचे डायरेक्टर म्हणून काम पहिले. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी सॉलिडस या कंपनीला ही जागा फक्त 30 लाख रुपयांना विकली. तसेच त्या

कुर्ल्यातील गोवावाला काँप्लेक्समधील तीन एकर जमीन 30 लाखांना विकण्यात आली. परंतु याचं पेमेंट त्यांनी 20 लाखांच केलंय. आजही त्या जागेत एक मोठा शेड सॉलिडस कंपनीला भाड्याने दिला आहे.

दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला एक वळण दिल असून या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र रंगेलेल आहे. या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. तसेच नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप होताना दिसून आले. हे प्रकरण सुरु झालेपासून नवाब मलिकांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर आरोप करत दावे केले होते. हे सर्व फडणवीसांपर्यंत ही पोहोचले होते. अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यातील ड्रग्जचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस आहेत असा खळबळजनक दावा केला होता. याला प्रत्युत्तर फडणवीसांनी केले. आज मात्र देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर टीका करत तोफ डागली. आता नवाब मलिक फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com